• Download App
    लष्कर-ए-तय्यबा, लष्कर ए जहाँगवी दहशतवादी संघटनांनी काबूलमध्ये तळ बनविले; अफगाण सरकारी फौजांच्या घातक शास्त्रांवर दहशतवाद्यांचा कब्जा|Lashkar-e-Tayyaba, Lashkar-e-Jhangvi terrorist organizations set up camp in Kabul; Terrorists capture deadly weapons of Afghan government forces

    लष्कर-ए-तय्यबा, लष्कर ए जहाँगवी दहशतवादी संघटनांनी काबूलमध्ये तळ बनविले; अफगाण सरकारी फौजांच्या घातक शास्त्रांवर दहशतवाद्यांचा कब्जा

    वृत्तसंस्था

    काबूल : पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबा आणि लष्कर ए जहाँगवी यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्यामध्ये दहशतवाद्यांचे तळ बनविले असून अनेक चेकपोस्टवर दहशतवाद्यांचा कब्जा आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सरकारी फौजांनी शरणागती पत्करताना जी शस्त्रास्त्रे तालिबान्यांच्या ताब्यात दिली आहेत, त्यापैकी काही शस्त्रास्त्रे आता दहशतवाद्यांच्या कब्जात गेली आहेत. यातून अफगाण नागरिकांना धोका उद्भवतो तोच त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा एवढा प्रचंड साठा दहशतवाद्यांच्या कब्जात जाणे भारतासाठी सर्वाधिक धोकादायक आहे.Lashkar-e-Tayyaba, Lashkar-e-Jhangvi terrorist organizations set up camp in Kabul; Terrorists capture deadly weapons of Afghan government forces

    तालिबानची राजवट आल्यानंतर काबूलमध्ये दुसऱ्याच दिवशी जर दोन दहशतवादी संघटना आपले तळ बनवत असतील आणि चेक पोस्ट ताब्यात घेत असतील तर येत्या काही दिवसांत आणखी किती दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये तळ बनवतील आणि सरकारी फौजांनी सोडून दिलेली घातक शस्त्रास्त्रे ताब्यात घेतील याचा विचारही थरकाप उडवतो, असे स्पष्ट मत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे.



    अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय हिला मुक्तद्वार मिळेल. ती मोकाट सुटली की एकापेक्षा एक बड्या दहशतवादी संघटनांचे स्थळ अक्षरशः आठवडाभरात तिथे उभे राहतील. त्यातून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र प्रशिक्षण ताबडतोब सुरू केले जाईल आणि त्याचे परिणाम भारतामध्ये अधिक गंभीर आणि भयावह असतील, असा इशारा सरकारी पातळीवरून देखील देण्यात आला आहे.

    अफगाणिस्तानची सरकारी फौज तीन लाख सैनिकांची असल्याचे सांगण्यात येते. त्यांना अमेरिकेने आणि नाटो फौजांनी गेली 15 वर्षे प्रशिक्षण दिले होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पुरवली होती. ही सर्व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आता तालिबान्यांच्या ताब्यात गेली आहेत. त्यातली अनेक शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांनी कब्जा घेतली आहेत. भविष्यकाळात हे प्रमाण आणखी वाढेल. कारण अफगाणिस्तानातील सरकारी फौज पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

    अमेरिकेने दिलेल्या आणि नाटो फौजांनी दिलेल्या शस्त्रास्त्रांचा वापर तालिबानच्या फौजा करतील. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवतील. प्रशिक्षण देतील आणि यामध्ये आयएसआय मोठ्या प्रमाणावर सहभागी असेल, याकडे भारतीय सरकारी प्रवक्त्याने लक्ष वेधले आहे.

    शशी थरुर यांच्या वक्तव्यातून देखील हीच भयावहता प्रतिबिंबित होत आहे. अफगाणिस्तान विषयी धोरण ठरवत असताना भारताने यापुढे अतिशय काळजीपूर्वक पावले टाकली पाहिजेत. त्याचबरोबर प्रसंगी आक्रमक धोरणही आखले पाहिजे, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. शशी थरुर हे आज कॉग्रेसचे खासदार असले तरी संयुक्त राष्ट्र संघ येथील त्यांचा अनुभव मोठा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाची त्यांची जानकारी सखोल आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला दिलेला हा सल्ला राजनैतिक दृष्ट्या महत्वाचा आहे.

    Lashkar-e-Tayyaba, Lashkar-e-Jhangvi terrorist organizations set up camp in Kabul; Terrorists capture deadly weapons of Afghan government forces

    विशेष प्रतिनिधी

     

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त