• Download App
    नोकरीची संधी : केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात मोठी भरती; लवकर करा अर्ज Large recruitment in Central Govt Atomic Energy Department; Apply early

    नोकरीची संधी : केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात मोठी भरती; लवकर करा अर्ज

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने अणुऊर्जा विभागातील कनिष्ठ अनुवाद अधिकारी आणि सहाय्यक सुरक्षा अधिकारी रिक्त पदांकरता अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीकरता तुम्ही amd.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, या विभागाकडून एकूण ३२१ पदांकरता भरती केली जाणार आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ नोव्हेंबर २०२२ आहे. Large recruitment in Central Govt Atomic Energy Department; Apply early

    कोणत्या पदांवर होणार भरती

    अणुऊर्जा विभागात (DAE) एकूण ३२१ पदे भरले जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी याकरता ९ पदे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी ए याकरता ३८ पदे आणि सुरक्षा रक्षकाकरता २७४ पदांवर भरती केली जाणार आहे.

    काय आहे वयोमर्यादा

    अणुऊर्जा विभागात (DAE) भरती होणाऱ्या कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असणं बंधनकारक आहे. सहाय्यक सुरक्षा अधिकारी ए आणि सुरक्षा रक्षक या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असायला हवी.

    कशी होणार निवड प्रक्रिया

    वरील तिनही पदांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी विविध पात्रता विहित करण्यात आली असून या पदांवर निवड होण्यासाठी उमेदवारांना लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणी यातून जावे लागणार आहे. कनिष्ठ अनुवाद अधिकारी आणि सहाय्यक सुरक्षा या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामन्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २०० रूपये, सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क असणार आहे. SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क या अर्जाकरता आकारले जाणार नाही.

    Large recruitment in Central Govt Atomic Energy Department; Apply early

     

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले