दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.40 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्फोटानंतर न्यायालयातील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Laptop blast in Rohini Court in Delhi, work suspended, police start investigation
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील रोहिणी कोर्टात गुरुवारी सकाळी स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना सकाळी 10.40 वाजता स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. स्फोटानंतर न्यायालयातील कामकाज स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅगेत लॅपटॉपसोबत टिफिन होता. टिफिनचा स्फोट होण्याचीही शक्यता आहे. अँटी टेरर युनिटच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे, “जोपर्यंत बीडीएस आणि एफएसएल तज्ज्ञ याचा तपास करत नाहीत, तोपर्यंत हा स्फोट कसा झाला आणि तो कोणत्या प्रकारचा होता हे सांगता येणार नाही.”
एक जण जखमी
स्फोटामुळे रोहिणी बार कौन्सिलमध्ये एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. राजीव असे जखमी जवानाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या शरीरात छर्रे घुसल्याचे सांगण्यात येत आहे.
Laptop blast in Rohini Court in Delhi, work suspended, police start investigation
महत्त्वाच्या बातम्या
- Rajnath Singh in Parliament : सीडएस बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर काय झाले? घटनेची चौकशी कोण करणार? राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली माहिती
- नव्या सीडीएसपुढे नवी आव्हाने; थिएटर कमांडची निर्मिती – कार्यवाही!!
- पुणे – सातारा महामार्गाजवळ आढळलेल्या रानगव्यांना वन विभागाने पुन्हा जंगलात सोडले
- रेशनकार्ड हवे तर मग जातीच्या प्रमाणपत्राची सक्ती; नव्या नियमामुळे सामान्य जनतेच्या डोक्याला ताप
- CDS Helicopter Crash : हेलिकॉप्टर दुर्घटनेवर माजी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी व्यक्त केला संशय, एनआयए चौकशीची केली मागणी