• Download App
    जमीन घोटाळ्याप्रकरणी 'ED'चे राबडी देवींना समन्स Land for Job Scam ED summons Rabri Devi in case of land scam

    Land for Job Scam : जमीन घोटाळ्याप्रकरणी ‘ED’चे राबडी देवींना समन्स

    ९ फेब्रुवारीला दिल्लीत हजर राहण्यासाठी बोलावले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या Land for Job Scam प्रकरणावरून अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपपत्राची दखल घेत दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी, अमित कात्याल आणि दोन कंपन्यांविरुद्ध समन्स जारी केले आहेत. Land for Job Scam ED summons Rabri Devi in case of land scam

    न्यायालयाने त्यांना ९ फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी बोलावले आहे. बिहारमध्ये राजकीय गोंधळ सुरू असताना राबडी देवी आणि इतरांना न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.

    या कथित घोटाळ्यातील मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करताना अंमलबजावणी संचालनालयाने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने आरोपपत्रात राबडी देवी, मिसा भारती, हेमा यादव, हृदयानंद चौधरी यांच्यासह दोन कंपन्यांचे नाव आरोपी म्हणून ठेवले आहे. या प्रकरणी ईडीने 4751 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

    न्यायालयाने व्यावसायिक अमित कात्याल विरोधात प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे. कात्याल मात्र या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ईडीच्या आरोपपत्रावर सुनावणी करताना राऊस अव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी आदेश जारी करताना म्हटले की, दखल घेण्यास पुरेसे कारणं आहेत.

    Land for Job Scam ED summons Rabri Devi in case of land scam

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य