विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ‘‘ भारतात कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी वैज्ञानिक आधारावर सार्वजनिक आरोग्याशी निगडित उपाययोजना तातडीने करण्याची गरज आहे. जोपर्यंत लसीकरण वेगाने सुरू होत नाहीLancet lashes on Indias effort
तोवर कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलायला हवीत,’’ असे मत प्रसिद्ध वैद्यकीय संशोधन नियतकालिक ‘लॅन्सेट’ने आपल्या संपादकीयात व्यक्त केले आहे.
काही महिने कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर आपण कोरोनाला हरविले असे दाखवायला सरकारने सुरुवात केली. दुसऱ्या लाटेचा तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका ओळखला गेला नाही, असा ठपकाही या लेखात ठेवण्यात आला आहे.
‘‘सुरुवातीच्याटप्प्यांत कोरोनावर नियंत्रण मिळविल्यानंतर सरकारच्या कृती दलाची बैठकच झालेली नाही, त्याचे परिणा सर्वांसमोर आहेत. कोरोनाच्या संसर्गाचे संकट वाढत आहे.
भारताला यासंदर्भात नव्याने पावले उचलण्याची गरज आहे. सरकार स्वतःच्या चुका मान्य करणार का, यावर नव्या धोरणाचे यश अवलंबून असेल,’’ असे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे. तसेच पारदर्शी नेतृत्व हाही महत्त्वाचे मुद्दा आहे, असे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे.
‘‘लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी लशींचा पुरवठा वाढविणे आणि वितरण केंद्रे उभारणे, अशा दोन्ही गोष्टी करायला हव्यात. ग्रामीण भागात ६५ टक्के जनता राहते. त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सोयीसुविधा पोहोचत नाहीत, यासाठी सरकारला काम करावे लागेल,’’ असे ‘लॅन्सेट’ने म्हटले आहे.
Lancet lashes on Indias effort