• Download App
    लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर|Lalu's two children sparked brotherhood, photos of each other turned black on the verge of splitting

    लालूंच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी, एकमेंकांच्या फोटोंना काळे फासू लागले राष्ट्रीय जनता दल फुटीच्या उंबरठ्यावर

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : अनेक वर्षांनंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर लालूप्रसाद यादव सध्या पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, घरातूनच त्यांना अडचण सुरू झाली आहे. त्यांच्या दोन मुलांमध्ये भाऊबंदकीची ठिणगी पडली आहे. तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांनी पोस्टरवर एकमेंकांचे फोटो काढणे आणि काळे फासणे सुरू केले आहे.Lalu’s two children sparked brotherhood, photos of each other turned black on the verge of splitting

    लालूंचा मुलगा तेजप्रताप यादव सुरूवातीपासूनच तेजस्वीवर नाराज आहे. तेजस्वी यादवचे नेतृत्व त्याला मान्य नाही. त्यामुळे त्याने आपल्या कार्यकर्त्यांना तेजस्वीचे फोटो पोस्टरवरून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर तेजस्वीने त्याला झटका देत पाटणा येथील मुख्यालयातूनच तेजप्रतापचे पोस्टर खाली उतरविले.



    राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यालयात विद्यार्थी संघटनेचा एक कार्यक्रम झाला. यामध्ये तेजप्रताप प्रमुख पाहुणा होता. यासाठी तेजप्रतापचे मोठेमोठे पोस्टर दिसले, मात्र, तेजस्वी यादवचा चेहरा गायब होता. हा वाद वाढला तेव्हा त्या पोस्टरवरील तेजप्रताप यादव याच्या चेहऱ्यावर काहींनी काळे फासले. आता रातोरात हे पोस्टरदेखील उतरवण्यात आले आहेत. आता या जागी नवीन पोस्टर लागले आहेत, यामध्ये लालू यादव, राबडी देवी यांच्यासह तेजस्वी यादवचे फोटो आहे. मात्र, तेजप्रताप गायब झाला आहे.

    नवीन पोस्टरमध्ये तेजस्वीचा फोटो आहे, पण तेजप्रतापचा का नाहीय. यावरून लालूंच्या पक्षात सत्तासंघषार्ला सुरुवात झाली आहे. राजदचे प्रवक्ते शक्तीस सिंह यादव यांनी सांगितले की, दोन्ही भावांमध्ये काहीही असे सुरु नाही. रविवारी जे झाले ती एक मानवी चूक होती. तेजप्रताप यादव यांनी आधीच तेजस्वी भविष्यातील मुख्यमंत्री असेल असे स्प्ष्ट केलेले आहे.

    लालूप्रसाद यादव यांना सात मुली आणि दोन मुले आहेत. मुलींपैकी मिसा भारती याच फक्त राजकारणात सक्रीय आहेत. सध्या राष्ट्रीय जनता दलाच्या राज्यसभा खासदार आहेत. सातही मुली उच्चविद्याविभूषित आहेत. मात्र, दोन मुले मात्र शिकलेली नाहीत. तेजस्वी यादव हे नववी तर तेजप्रताप यादव हे बारावी झाले आहेत. मात्र, लालूंनी आपले राजकारणातील वारस म्हणून तेजस्वी यादव यांना पुढे आणले आहे. त्यामुळे तेजप्रताप यादव नाराज आहेत.

    Lalu’s two children sparked brotherhood, photos of each other turned black on the verge of splitting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे