• Download App
    लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल|Lalu Prasad Yadav's fodder scam probe completed, verdict to be announced on February 15

    लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल

    विशेष प्रतिनिधी

    रांची: चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय येत्या १५ फेब्रुवारी रोजी आपला निर्णय सुनावणार आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह ११० जणांवर या प्रकरणात आरोप ठेवण्यात आलेले आहेत.Lalu Prasad Yadav’s fodder scam probe completed, verdict to be announced on February 15

    दुमका कोषागार प्रकरणात लालू यांना शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ते १९ मार्च २०१८ पासून कारागृहात शिक्षा भोगत होते. गेल्या १७ एप्रिल रोजी त्यांना झारखंड उच्च न्यायालयाने जामीन दिला होता. त्यानंतर प्रत्यक्षात ३० एप्रिल रोजी त्यांची कारागृहातून सुटका झाली होती.



    आता चारा घोटाळ्यातीलच डोरंडा कोषागार प्रकरणाचा निकाल येणार असल्याने लालूंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. विशेष सीबीआय कोर्टात या खटल्याची सुनावणी आज पूर्ण झाली. त्यानंतर कोटार्ने निर्णय राखून ठेवत १५ फेब्रुवारी ही तारीख निकालासाठी निश्चित केली.

    या प्रकरणात लालूप्रसाद यांच्यासह जगदीश शर्मा, डॉ. आर. के. शर्मा, ध्रुव भगत, पाच आयएएस अधिकारी, ३० पशु वैद्यकीय अधिकारी, सहा लेखापाल, ५६ पुरवठादार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत. या कोषागारात १३९.३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप असून सीबीआयने सुरुवातीला १७० जणांवर गुन्हा दाखल केला होता.

    त्यातील १४७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. २६ वर्षांपासून हा खटला सुरू असून बिहारचे माजी मुख्यमंत्री डॉ. जगन्नाथ मिश्रा यांच्यासह ३७ आरोपींचे आतापर्यंत निधन झाले आहे.रांची येथील सीबीआय कोर्टात लालूप्रसाद यादव यांच्याविरुद्ध चारा घोटाळा प्रकरणी पाच वेगवेगळे दावे दाखल करण्यात आले होते.

    त्यातील चार खटल्यांचा निकाल लागला असून सर्वच प्रकरणात लालूंना शिक्षा सुनावली गेली आहे. आता पाचव्या आणि अंतिम खटल्याच्या निकालाची तारीख आज निश्चित झाली आहे. हे सर्वात मोठे प्रकरण असून लालूंना दोषी ठरवून शिक्षा सुनावली जाणार की दिलासा मिळार हे आता १५ फेब्रुवारीलाच स्पष्ट होणार आहे.

    Lalu Prasad Yadav’s fodder scam probe completed, verdict to be announced on February 15

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो