• Download App
    लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली "संधी"; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK - INDI परिवारवादाची "दांडी"!!| Lalu gave Modi an "opportunity" from Patna yesterday; Modi blew the DMK - INDI family's "stick" out of Chennai today!!

    लालूंनी काल पाटण्यातून मोदींना दिली “संधी”; मोदींनी आज चेन्नईतून उडवली DMK – INDI परिवारवादाची “दांडी”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने 195 उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असतानाच बिहारच्या पाटण्यातील गांधी मैदानातून लालूप्रसाद यादव यांनी मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परिवार वादाच्या मुद्द्यावर अश्लाघ्य टीका करून मोदींनाच प्रत्युत्तर देण्याची संधी दिली आणि त्या संधीचा पुरता लाभ उठवत मोदींनी चेन्नईत जाऊन DMK आणि INDI आघाडीतल्या परिवारवादाची दांडी उडवली!!Lalu gave Modi an “opportunity” from Patna yesterday; Modi blew the DMK – INDI family’s “stick” out of Chennai today!!

    लोकसभा निवडणुकीत भाजप आक्रमक होण्यासाठी वेगवेगळे मुद्दे शोधतच होता. तो मुद्दा लालूप्रसाद यादव यांनी पाटण्यातल्या गांधी मैदानातून आयता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात दिला. त्यांनी मोदींवर परिवारवादाच्या मुद्द्यावर असभ्य शब्दांमध्ये टीका केली. मोदी परिवार वादावर बोलतात. ज्यांना जास्त मुले आहेत, त्यांच्यावर टीका करतात, पण खुद्द मोदींना परिवार का नाही??, त्यांना मुले का झाली नाहीत??, ते तर स्वतः हिंदू देखील नाहीत. कारण त्यांच्या आईच्या निधनानंतर त्यांनी मुंडन केले नव्हते, असे असभ्य उद्गार काढून लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले होते.



    लालूप्रसाद यादव यांच्या या टीकेनंतर देशभरात मोदींच्या 140 करोड जनतेच्या परिवाराची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर #मोदी का परिवार ट्रेंड सुरू झाला. मोदींनी तेलंगणातल्या सभेत लालूप्रसादांना 140 करोड जनता हाच माझा परिवार आहे, असे प्रत्युत्तर दिले.

    पण तेवढेच उत्तर देऊन मोदी थांबले नाहीत.

    त्यापुढे जाऊन आज चेन्नईतल्या महासभेत त्यांनी परिवारवादी पक्षांचे पुरते वाभाडे काढले. पंतप्रधान मोदी म्हणाले, परिवारवादी पक्ष कष्ट करायचे विसरून गेले आहेत. त्यांचे जनतेशी नाते तुटले आहे. आपल्या ताब्यात सत्ता आली की ते आपापल्या राज्यांमधल्या जनतेला आपापल्या पक्षांचे गुलाम समजतात. भ्रष्टाचार आणि परिवारवाद यापलीकडे त्यांना कुठलेच मुद्दे दिसत नाहीत. सत्तेवर आले की भ्रष्टाचार करून परिवाराच्या तुंबड्या भरायच्या आणि सत्तेवरून गेले की देशात जातीपातींच्या मुद्द्यावर अराजक माजवायचे हे परिवारवादी पक्षांचे “उद्योग” आहेत.

    मलाच विरोधक विचारतात माझा परिवार कुठे आहे?? पण मी सांगतो, मी तरुणपणी माझे घर सोडले. संपूर्ण देशालाच आपला परिवार मानले. परिव्राजक म्हणून देशभर फिरलो. आज 140 कोटी जनता हाच माझा परिवार बनला आहे. आया – बहिणी – भाऊ – वडील हे सगळे माझा परिवार आहेत. परिवारवादी पक्षांचे नेते म्हणतात “परिवार फर्स्ट”, पण मी म्हणतो “नेशन फर्स्ट”!!, मोदींनी या शब्दांमध्ये चेन्नईतल्या सभेत फुल बॅटिंग केली.

    DMK प्रमुख आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या परिवारवादावर देखील मोदी बरसले. मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टालिन यांनी मध्यंतरी डेंगी – मलेरिया अशा शब्दांमध्ये संबोधून सनातन धर्माचा अपमान केला होता. त्यावर आजच सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले. त्याचा उल्लेख देखील मोदींनी चेन्नईतल्या भाषणात आवर्जून केला. सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या परिवारवादी मंत्र्याला सुप्रीम कोर्टाने फटकारले याची आठवण त्यांनी या सभेत करून दिली.

    एरवी राहुल गांधी बेलगाम शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींवर शरसंधान साधत असतात. त्याचा दुष्परिणाम काँग्रेस यशावर होत असतो, पण 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांच्या ऐवजी लालूप्रसादांनी पाटण्यातल्या सभेत असभ्य भाषेत मोदींवर परिवारवादाच्या मुद्द्यावर टीका केली. पण ती “संधी” साधून मोदींनी देशभर फिरून परिवारवादी पक्षांना सडकून काढायला सुरुवात केली आहे!!

    Lalu gave Modi an “opportunity” from Patna yesterday; Modi blew the DMK – INDI family’s “stick” out of Chennai today!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य