विशेष प्रतिनिधी
पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी दोन्ही मुलांच्यार वादात तेजस्वी यादव यांना साथ दिली आहे. यादव कुटुंबातील इतर सदस्यही तेजप्रताप यांच्याबद्दल सध्या फारसे बोलत नाहीत. कुटुंबप्रमुख असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या् भूमिकेमुळे तेजप्रताप व तेजस्वी या भावंडांमधील मतभेद व मनभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. lalu backs tajaswi in party politics
तेजप्रताप हे तेजस्वी यादव यांच्याविरोधात जी भाषा वापरत आहेत, ती पाहता दोघांची मने पुन्हा जुळणे सोपे नाही. दोघांमधील संघर्ष रस्त्यातवर आल्यानंतर दोघेही रविवारी दिल्लीला स्वतंत्रपणे गेले. लालू प्रसाद यादव हे दिल्लीत उपचार घेत आहेत.
वडिलांना भेटून स्वतःची बाजू मांडण्याच्या आशेने तेजप्रताप हस्तिनापूरला पोचले, पण लालू त्यांना भेटलेच नाही. ते तेजप्रतापवर एवढे नाराज आहेत की, त्यांची भेटही टाळली. उलट तेजस्वी यादवला भेटून लालू प्रसाद यादव यांनी मोठ्या मुलाची माहिती घेतली. वडिलांच्या भेटीचे छायाचित्रही तेजस्वी यांनी शेअर केले आहे. वडील भेटले नाही तरी आई राबडी देवी आणि बहिणींबरोबरील छायाचित्र तेजप्रताप यादव यांनी शेअर केले आहे.
lalu backs tajaswi in party politics
महत्त्वाच्या बातम्या
- इन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये
- युवराजांच्या बालहट्टाची किंमत १६८ कोटी रुपये, सायकल ट्रॅकला महामार्गापेक्षा ५०० पट अधिक खर्च
- ‘योगी नाही हा तर भोगी… असं वाटलं त्याच चपलेनं थोबाड फोडावं’ : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, अटकेची मागणी
- राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया