विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी (LK Advani Birthday) आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
देश कायम अडवणींच्या ऋणात राहील- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अडवाणींन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. लोकांचे सक्षमीकरण आणि भारताचा सांस्कृतिक अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी देश त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठीही त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. देश त्यांच्या कायम ऋणात राहिल, अशा शब्दात मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही अडवाणींना शुभेच्छा दिल्या. केले आहे. “आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. त्यांची विद्वत्ता, दूरदृष्टी, बौद्धिक क्षमता आणि मुत्सद्देगिरी सर्वांनाच मान्य आहे. भारतातील सर्वात आदरणीय नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. देव त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य देवो”, असं ट्विट राजनाथ सिंह यांनी केले.
प्रेरणास्त्रोताला वाढदिवसाच्या शुभेच्छा- जे पी नड्डा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘भाजपला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. अडवाणीजी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अमित शहांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अविरत संघर्षातून भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवून संघटनेला अखिल भारतीय रूप देण्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आदरणीय लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सदैव निरोगी रहा आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…”
Lal krishna advani 94 birthday pm narendra modi Amit Shah rajnath singh JP Nadda bjp ministers greetings
महत्त्वाच्या बातम्या
-
- ब्रिटनमध्ये प्रथमच महात्मा गांधीजींचे चित्र असलेले नाणे प्रसिद्ध
- प. बंगालमध्ये इंधनावरील व्हॅट कमी करण्याची भाजपची तृणमूल काँग्रेसकडे मागणी
- रशियाचे तब्बल ९० हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर, तणाव वाढला
- अमिताभ बच्चन यांच्या घरातील पेंटिंगची चर्चा
- भारताची भूमी बळकाविण्यासाठी चीनच्या सातत्याने व्यूहात्मक खेळी – अमेरिकेचा अहवाल