वृत्तसंस्था
लक्षद्वीप – लक्षद्वीप प्रशासनाचे प्रशासनाचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरू पाहतोय. त्यांच्या प्रशासनाने दोन काँग्रेस खासदारांना लक्षद्वीपमध्ये येण्यास प्रतिबंध घातला आहे. Lakshadweep denies entry to Kerala Congress leaders, calls it ‘planned effort to disturb peace’
काँग्रेसचे खासदार हिबी इडन आणि टी. एन. प्रतापन यांचा लक्षद्वीप दौरा राजकीय कारणांसाठी आहे. त्यामुळे बेटावरची शांततेचे वातावरण खराब होऊ शकते, असे लक्षद्वीप प्रशासनाने म्हटले आहे. या दोन्ही खासदारांनी लक्षद्वीपच्या दौऱ्याचे कारण तेथील प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करण्याचे आणि जनतेला भेटण्याचे दिले होते. प्रशासनाने नेमके हेच राजकारण आहे, असे कारण देत त्यांच्या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. शिवाय या दोन्ही खासदारांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गर्दी झाली, तर कोरोना महामारी पुन्हा फैलावेल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दोन्ही खासदारांच्या दौऱ्यामुळे लक्षद्वीपमध्ये राजकीय वातावरण अशांत होईल. ते ते येथे येऊन स्थानिक नेत्यांना आणि नागरिकांना प्रशासनाविरोधात भडकवण्याचे काम करतील, असे लक्षद्वीपचे जिल्हा न्यायदंडाधिकारी असगर अली यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केले आहे.
प्रफुल्ल खोडा पटेल यांनी प्रशासकपदी आल्यानंतर लक्षद्वीपच्या व्यवस्थेमध्ये बरेच बदल केले आहेत. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही योजना राबविल्या आहेत. यावरून तेथील राष्ट्रवादीचे खासदार महंमद फैजल यांच्याशी त्यांचा राजकीय वाद आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील थेट पंतप्रधानांना पत्र लिहून त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर लक्षद्वीप प्रशासनाने काँग्रेसच्या २ खासदारांना दौऱ्याची परवानगी नाकारल्याने नाव वाद सुरू होऊ पाहतो आहे.
Lakshadweep denies entry to Kerala Congress leaders, calls it ‘planned effort to disturb peace’
महत्त्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात सोलापुरात आज आक्रोश मोर्चा; जिल्हाभरात संचारबंदी
- भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांची वेबसाईट हॅक झाल्याने खळबळ ; पाकिस्तानी हॅकरचे कृत्य ?
- गेल्या अधिवेशनात संजय राठोड, अनिल देशमुखांच्या विकेट गेल्या; पावसाळी अधिवेशनात अजित पवार, अनिल परबांच्या विकेट पडणार…??
- सुकन्या समृद्घी योजनेला मोठा प्रतिसाद; मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटींची गुंतवणूक
- शेतकरी धर्मालाच फासला हरताळ, भाजपा नेत्याच्या शेतातील धान्य उपटून काढले