• Download App
    हरिद्वारमध्ये तिसऱ्या शाहीस्नानालाही लाखो भाविकांची झुंबड, कोरोनाचा कुंभमेळ्यावर काहीच पिरणाम नाही |Lakhs of devotees attended Kumbh mela

    हरिद्वारमध्ये तिसऱ्या शाहीस्नानालाही लाखो भाविकांची झुंबड; कोरोनाचा कुंभमेळ्यावर काहीच परिणाम नाही

    विशेष प्रतिनिधी 

    डेहराडून : कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाही स्नानाच्यावेळी हरिद्वारमधील हर कौ पौडीमध्ये लाखो साधू आणि भाविकांची गंगेत डुबकी मारण्यासाठी झुंबड उडाली होती.दुपारपर्यंत आठ ते दहा लाख भाविकांचे स्नान झाले होते.Lakhs of devotees attended Kumbh mela

    १३ पैकी चार आखाड्यांच्या साधूंचाही त्यात समावेश होता. कोणताही अडथळा न येता शाहीस्नान सुरळीत पार पडत आहे.आखाड्याच्या साधूंनी आपल्याबरोबर पालख्या सजवून त्यात देवतांचे मुखवटे, मुर्ती आणल्या होत्या. या मूर्तींनाही स्नान घालण्यात आले.



    हर की पौडीचा परिसर केवळ साधुंसाठी राखीव होता. हरिद्वार आणि ऋषिकेष येथील इतर घाटांवर लाखो सामान्य भाविकांनी स्नान केले.प्रारंभी पहाटे नीरंजनी आखाड्याचे आचार्य कैलाशानंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली साधू आणि नागा सन्याशांनी स्नान केले.

    त्यानंतर आनंद आखाड्याचे साधू गंगेत उतरले. जुना आखाड्याच्या साधूंची संख्या सर्वाधिक होती. त्यांचे नेतृत्व स्वामी अवधेशानंद यांनी केले.मेष संक्रांत आणि बैसाखीनिमित्त शाहीस्नानाची पर्वणी होती. दोन दिवस आधी सोमवती अमावस्येनिमित्त दुसरे शाही स्नान झाले होते.

    त्यानंतर १०२ जणांना कोरोना संसर्ग झाला, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे कुंभमेळ्यात अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे.

    Lakhs of devotees attended Kumbh mela

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!