तसंच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला आहे.Lakhimpur: Waiting for report till late at night; Yogi Sarkar slapped by Supreme Court, next hearing to be held on October 26
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लखीमपूर हिंसाचार प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा योगी सरकारला फटकारलं आहे.शुक्रवारपर्यंत सुनावणी टाळण्याची मागणीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडणारे वकील हरिष साळवे यांना म्हटलं की, न्यायालयाने काल रात्री उशिरा रिपोर्ट सबमिट करण्यासाठी वाट पाहिली मात्र ते होऊ शकलं नाही.
हरिष साळवे यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, सील बंद लिफाफ्यात स्टेटस रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला आहे. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही काल रात्रीपर्यंत रिपोर्टसाठी वाट पाहिली मात्र आता रिपोर्ट हातात आला आहे. इतक्या उशिरा रिपोर्ट दिला तर आम्ही तो कसा वाचायाचा? किमान एक दिवस आधी तरी तो द्यायला हवा होता.
सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या तपासावर प्रश्न उपस्थित केलाय.न्यायालयाने विचारल की ,’या प्रकरणी आणखी काही लोकांची चौकशी का केली नाही. तुम्ही आतापर्यंत १६४ पैकी फक्त ४४ लोकांचीच चौकशी केली आहे.’ या प्रश्नावर उत्तर प्रदेश सरकारचे वकील हरिष साळवे यांनी उत्तर दिलं की, लखिंपुर प्रकरणी चौकशी सुरु असून सर्व मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात सांगितलं आहे की , उत्तर प्रदेश सरकारने लखीमपूर प्रकरणातील साक्षीदारांना सुरक्षा पुरवू .तसंच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार असून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला आहे.आता पुढच्यावेळी २६ ऑक्टोबरच्या आधी रिपोर्ट द्या असंही यावेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
काय आहे नेमक प्रकरण ?
रविवारी दुपारच्या सुमारास उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य हे लखीमपूर खिरी येथे येणार होते. मात्र, त्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी हेलिपॅडला घेराव घातला. दरम्यान, केशव मौर्य हे आपला कार्यक्रम संपवून केंद्रीय राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तेनी यांच्या घराकडे रवाना झाले. याची माहिती मिळताच अजय कुमार यांचा मुलगा घाईघाईत घरी जायला निघाला. त्याच्या गाडीचा ताफा तिकोनिया येथील बनबीरपुर चौकात पोहोचताच तेथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्याचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता ती थेट शेतकऱ्यांच्या अंगावर चढवण्यात आली.
हा सर्व प्रकार जाणूनबूजून करण्यात आला, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार घडल्यानंतर शेतकऱ्यांनी या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तसेच कारमध्ये बसलेले भाजपा कार्यकर्ता आणि आशिष मिश्रा यांना घेरले. त्यानंतर आशिष मिश्रा यांनी परवानाधारक रिव्हॉल्वरने गोळीबार केला. या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध होत आहे. आशिष मिश्राविरोधात ३०२, ३०४ ए, १४७, १४८, १४९, २७९, १२० बी यासह सर्व गंभीर कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
Lakhimpur: Waiting for report till late at night; Yogi Sarkar slapped by Supreme Court, next hearing to be held on October 26
महत्त्वाच्या बातम्या
- BHAVNA GAWLI : चिकनगुनियाची लागण झाल्याने ; चौकशीला हजर राहू शकत नाही:भावना गवळींचं ईडीला उत्तर
- KUSHINAGAR AIRPORT : बौद्ध स्थळांना जोडणाऱ्या कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण ; पंतप्रधान मोदी महापरिनिर्वाण मंदिरात- बोधी वृक्षाचं रोपण
- FACEBOOK : आता फेसबुकचे नाव बदलणार , मार्क झुकरबर्ग लवकरच घोषणा करणार
- BAHUBALI MARATHI : सुपरहिट बाहुबली सिनेमा आता येणार मराठीत- दिग्गज कलावंत आले एकत्र