• Download App
    लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राहुल गांधींचे राजकीय पर्यटन, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांची भेट घ्यायला का नाही गेले?गिरीराज सिंह यांची टीका। Lakhimpur Khiri tour is Rahul Gandhi's political tour, why didn't he go to visit those killed in Kashmir? Criticism by Giriraj Singh

    लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राहुल गांधींचे राजकीय पर्यटन, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांची भेट घ्यायला का नाही गेले?गिरीराज सिंह यांची टीका

    राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे. त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही? असा सवालही गिरीराज सिंह यांनी केला आहे. Lakhimpur Khiri tour is Rahul Gandhi’s political tour, why didn’t he go to visit those killed in Kashmir? Criticism by Giriraj Singh


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी केला आहे. त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही? असा सवालही गिरीराज सिंह यांनी केला आहे.

    उत्तर प्रदेश सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर राहुल आणि प्रियंका यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. लवप्रीतने दिलेलं बलिदान कधीही विसरणाऱ नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. जोपर्यंत पीडित कुटुंबीयास न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा सत्याग्रह चालूच राहिल, असा इशारा दिला आहे. यावरून गिरीराज सिंह यांनी टीका करताना म्हटले आहे की राहुल गांधींचा लखीमपूर खिरी येथील दौरा हा फक्त राजकीय पर्यटनाचा एक नमुना आहे. जिथे जिथे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना संधी मिळते तिथे तिथे ते आपल्या राजकीय पर्यटनासाठी जातात.



    राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही. माझा एक प्रश्न आहे. राहुल गांधींनी लखीमपूरमधील त्या घटनेत मारल्या गेलेल्या पत्रकाराच्या कुटुंबाला भेट का दिली नाही? त्यांनी काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना भेट का दिली नाही?

    Lakhimpur Khiri tour is Rahul Gandhi’s political tour, why didn’t he go to visit those killed in Kashmir? Criticism by Giriraj Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य