Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज जामीन मंजूर केला. Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail
वृत्तसंस्था
लखनऊ : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने आज जामीन मंजूर केला.
न्यायमूर्ती राजीव सिंह यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला आहे. 18 जानेवारी रोजी लखनऊ खंडपीठाने सुनावणीनंतर निर्णय राखून ठेवला होता. आशिष मिश्रा यांच्यावर लखीमपूर खेरी जिल्ह्यातील तिकोनिया गावात गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला आंदोलक शेतकऱ्यांना जीपखाली चिरडल्याचा आरोप आहे.
संपूर्ण घटना सुनियोजित कट – SIT
या प्रकरणाचा तपास करणार्या एसआयटीला त्यांच्या तपासात निष्पन्न झाले की, शेतकर्यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होती. यानंतर एसआयटीने 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आशिष मिश्रा हत्येचा आरोप असल्याचे आढळले. एसआयटीने या घटनेत एकूण 16 जणांना आरोपी बनवले होते. एसआयटीने आरोपींवर IPC कलम 307, 326, 302, 34,120B, 147, 148,149, 3/25/30 लावले आहेत.
आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढवली
गेल्या वर्षी ३ ऑक्टोबरला लखीमपूर खेरीतील टिकुनिया येथे चार शेतकरी कृषी कायद्यांचा निषेध करत एका कार्यक्रमातून परतत असताना एका एसयूव्ही कारने त्यांना चिरडले होते. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात काही लोकांचा मृत्यूही झाला होता. ही एसयूव्ही अजय मिश्रा टेनी यांची असून त्यांचा मुलगा आशिष मिश्रा त्यात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. अनेक दिवसांच्या हिंसाचारानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर 9 ऑक्टोबर रोजी आशिष मिश्राला अटक करण्यात आली होती.
Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail
महत्त्वाच्या बातम्या
- Azadi Ka Amrut Mahotsav : ..जेव्हा एक एन. आर.आय. मुस्लिम भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करतो ! एका महिन्यासाठी गरीबांना मोफत रुग्णवाहिका सेवा …
- HijabControversy : “क्लासरूम महत्त्वाची, युनिफॉर्म नव्हे”; रामचंद्र गुहांनी ट्विट केला एका प्राध्यापिकेचा लेख!!
- Mohan Bhagwat : हिंदूंच्या ताकदीपुढे कोणीही टिकू शकत नाही, ते कोणाच्याही विरोधात नाहीत, सरसंघचालकांचे प्रतिपादन
- रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीनही आमदार राष्ट्रवादी विरोधात आक्रमक; पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्याची मागणी!!
- पत्नी नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याची रवी राणा यांना शिक्षा, आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी थेट 307 अंतर्गत गुन्हा