• Download App
    उत्तर प्रदेश, बिहारमधील मजुरांची फरफट, दिल्ली लॉकडाऊन घोषणेचा परिणाम ; बस, रेल्वे स्थानकावर मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी ।Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    उत्तर प्रदेश, बिहारमधील मजुरांची फरफट, दिल्ली लॉकडाऊन घोषणेचा परिणाम ; बस, रेल्वे स्थानकावर मजुरांची गावी जाण्यासाठी गर्दी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत 26 एप्रिलपासून लॉकडाऊनची घोषणा झाली आहे. त्यामुळे प्रवासी मजुरांची फरपट होत आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक मजुरांनी आपल्या गावचा रस्ता धरला असून बस आणि रेल्वे स्थानकावर गर्दी केली. Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    आनंद विहार आणि कौशांबी बस स्थानकावर उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी लोकांनी गर्दी केली. गेल्या वर्षीही मजुरांची गर्दी दिल्ली सीमेवर झाली होती. लॉकडाऊन वाढवला तर घरी जाण्यास अडचण होईल म्हणून मजुरांनी गावची वाट धरली आहे.



    मजूर धोका पत्करण्याची तयार नाहीत

    मजुरांना दिल्ली सोडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले होते. मजुरांची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. यंदा फक्त 6 दिवसांचा लॉकडाऊन आहे, असेही केजरीवाल यांनी सांगितले. पण मजुरांनी बस आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी केली. गेल्या वर्षीचा अनुभव प्रवासी मजूर विसरलेले नाहीत. ते कुठलाही धोका पत्करण्याची मजुरांची इच्छा नाही.

    Labor riots in Uttar Pradesh, Bihar, Delhi lockdown announcement result

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!