• Download App
    ‘कुनो’ चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; आणखी एक चित्ता आढळला मृतावस्थेत! Kuno cheetah death session continues Another cheetah was found dead

    ‘कुनो’ चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; आणखी एक चित्ता आढळला मृतावस्थेत!

    जाणून घ्या, आतापर्यंत किती चित्त्यांचा झाला आहे मृत्यू?

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ :  कुनो नॅशनल पार्क मध्ये दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून आणलेल्या चित्त्यांच्या मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आता आणखी एका मादी चित्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. तबलीशी पार्कमध्ये मादी चित्ता मृतावस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. Kuno cheetah death session continues Another cheetah was found dead

    कुनो नॅशनल पार्कमध्ये गेल्या चार महिन्यांत सहा चित्ता आणि तीन शावकांसह एकूण ९ चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये सध्या फक्त १४ चित्ते आणि एक शावक उरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही उद्यान व्यवस्थापनाच्या अडचणी वाढल्या आहेत. मादी चित्ताच्या मृत्यूबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीही चित्तांच्या सततच्या मृत्यूबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. ज्यामध्ये चित्त्यांबाबत चर्चा झाली. सध्या दक्षिण आफ्रिकेची एक टीमही कुनो पार्कमध्ये आहे, जी चित्त्यांवर सतत नजर ठेवून आहे.

    चित्यांच्या गळ्यात कॉलर आयडीचीही समस्या होती. गळ्यात कॉलर आयडी घातल्याने चित्त्यांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांच्या गळ्यातून कॉलर आयडी काढून टाकण्यात आला होता. तर सर्व चित्त्यांना मोकळ्या मैदानातून परत मोठ्या बंदिस्त जागेत हलवण्यात आले आहे.

    Kuno cheetah death session continues Another cheetah was found dead

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : कर्नल सोफिया अपमानप्रकरणी SCने MPच्या मंत्र्याला फटकारले, म्हटले- माफी मागण्यात उशीर झाला

    Delhi HC : HCचा कुलदीप सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास नकार; उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या न्यायिक कोठडीतील मृत्यू प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा

    Thalapathy Vijay : करूर चेंगराचेंगरीप्रकरणी अभिनेता विजयची 8 दिवसांत दुसऱ्यांदा चौकशी, गेल्या वेळी CBI ने 7 तास प्रश्नोत्तरे केली होती