विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विकृत विनोद खिल्ली उडवणाऱ्या कुणाल कामरा याने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून माफी नाही मागणार अशी मस्ती केली पण बिळात लपून अविष्कार स्वातंत्र्याची वकिली चालवली. कुणाल कामराविरुद्ध सगळ्या महाराष्ट्रात संताप उसळाला असला तरी ठाकरे परिवारासह लिबरल जमातीने त्याच्या बाजूने जमावडा जमा केला. जया बच्चन यांच्यासह त्याच्या बाजूने अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण तरी कुणाला कामरा लपून राहिला. तो बाहेर आलाच नाही. त्याने सोशल मीडिया वरून बडबड सुरू ठेवली. त्याने चार पानी स्टेटमेंट जारी केले. Kunal Kamra’s joke: I won’t apologize
एकनाथ शिंदे यांची माफी मागण्याचा प्रश्नच नाही. देशात राजकारण्यांची खिल्ली उडवायची नाही, तर कुणाची उडवायची??, एकनाथ शिंदे यांच्या बद्दल पूर्वी अजित पवार जे बोलले होते तेच मी वेगळ्या पद्धतीने बोललो त्यापेक्षा वेगळे काही बोललोच नाही त्यामुळे मी त्यांची माफी मागायचा प्रश्नच नाही. मला राज्यघटनेनुसार अविश्वास आविष्कार स्वातंत्र्य दिले आहे त्यानुसार मी बोलत असतो. मी बोलल्याबद्दल हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडफोड करायची काहीच कारण नव्हते. कारण माझ्या वक्तव्याला हॅबिटॅट स्टुडिओ जबाबदार नव्हता.
पण माझ्या बोलण्याने अशी कुठली कारवाई घडत असेल, तरी इथून पुढे मी एल्फिन्स्टन ब्रिजवर बोलायला सुरुवात करेन. म्हणजे मग बीएमसीचे कर्मचारी तिथे पोहोचतील आणि जिथे दुरुस्तीची आवश्यकता आहे तिथे तोडफोड होऊन जाईल. मी कोणाला घाबरत नाही. पोलिसांना आणि न्यायव्यवस्थेला मी चौकशी आणि तपासाला सहकार्य करेन, असे वक्तव्य त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले पण हे सगळे त्याने बिळात लपून केले. पण अजून पर्यंत बाहेर येऊन अविष्कार स्वातंत्र्याची वकिली करायची हिंमत त्याने केली नाही.
शिवसेना आपल्या स्टाईलने धडा शिकवेल
कुणाल कामरा किती दिवस लपून राहील कधीतरी बाहेर येईलच त्यावेळी शिवसेना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकवेल असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला सरकार आपल्या पद्धतीने त्याच्यावर कायदेशीर कारवाई करेल आणि शिवसेना आपल्या स्टाईलने त्याला धडा शिकवेल त्यात बदल होणार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील त्याच गोष्टीला दुजोरा दिला. देशाचे पंतप्रधान हिंदू देवता राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाटेल तसा अपमान करायचा आणि अविष्कार स्वातंत्र्य म्हणायचे असले प्रकार शिवसेना सहन करणार नाही. सरकार कामराविरुद्ध कारवाई करेल. शिवसेना आपल्या स्टाईलने कारवाई करेल, असे योगेश कदम म्हणाले.
Kunal Kamra statement I won’t apologize
महत्वाच्या बातम्या
- दोंडाईचा सौर प्रकल्पासाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे ऊर्जा विभागाला विशेष निर्देश, म्हणाले…
- Sanjay Shirsat सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांची घोषणा; 25 हजार विद्यार्थ्यांसाठी 125 वसतिगृहे सुरू करू, 1500 कोटींचा निधी राखीव
- Koradi ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!
- कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर टिप्पणी केली होती, ‘त्या’ स्टुडिओवर पडला BMCचा हातोडा