• Download App
    कुंभमेळ्यातील आजच्या शाही स्नानामुळे यंत्रणा धास्तावली; २० लाख भाविकांची शक्यता|Kumbh mela may be sprerder in next few days

    कुंभमेळ्यातील आजच्या शाही स्नानामुळे यंत्रणा धास्तावली; २० लाख भाविकांची शक्यता

    विशेष प्रतिनिधी 

    डेहराडून : कुंभमेळा देशामध्ये कोरोनासाठी सुपरस्प्रेडर ठरू शकतो अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याच्या स्थळी दीड लाख लोक उपस्थित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.Kumbh mela may be sprerder in next few days

    उद्याच्या (ता.१४) शाही स्नानाच्या दिवशी हीच गर्दी २० ते २५ लाखांवर पोचू शकते. एवढी गर्दी लक्षात घेता येथे कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे अशक्य असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोरोनाच्या सावटाखाली सोमवारी हरिद्वार येथे कुंभमेळ्याला सुरुवात झाली.



    पहिल्याच दिवशी साधू, महंतांसह हजारो लोकांनी गंगास्नान केले होते, यावेळी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोमवती अमावस्येच्या दिवशी पार पडलेल्या शाही स्नानानंतर मंगळवारी १०२ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आल्याने यंत्रणेची तारांबळ उडाली आहे.

    Kumbh mela may be sprerder in next few days

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहा जीमेलवरून स्वदेशी झोहो मेलवर शिफ्ट; म्हणाले- आता या आयडीवर मेल पाठवा; श्रीधर वेम्बूंनी तयार केले झोहो मेल

    Bihar : बिहार विधानसभा निवडणूक रालोआत जागावाटपावरून रस्सीखेच, 15 जागा नसल्यास लढणार नाही-जितन राम, मी रागावलो असे म्हणणे चुकीचेच- चिराग

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित