• Download App
    Congress Toolkit : ईद म्हणजे आनंदोत्सव, कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा । Kumba Super Spreader Eid is Happy Gathering Says Viral Congress Toolkit, Read Content Of Congress Toolkit

    Congress Toolkit Leaked : ईद आनंदोत्सव, तर कुंभ म्हणजे सुपरस्प्रेडर, काँग्रेसच्या टूलकिटमध्ये मोदी सरकार व हिंदूंना बदनाम करण्याची रूपरेषा

    Congress Toolkit Leaked : सोशल मीडियावर एक टूलकिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की, ती कॉंग्रेस पक्षाची आहे. या कागदपत्रांवर कॉंग्रेसचे निवडणूक चिन्हही छापलेले असून पक्षाने आपल्या नेत्यांना दिलेला दस्तऐवज अचानक लीक झाल्याचे सांगितले जात आहे. ट्विटरवर तो शेअर करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा खोचक टीका करत म्हणाले की, “कॉंग्रेस संकटकाळात लोकांची अशाप्रकारे मदत करत आहे.”


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक टूलकिट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याबद्दल भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की, ती कॉंग्रेस पक्षाची आहे. या कागदपत्रांवर कॉंग्रेसचे निवडणूक चिन्हही छापलेले असून पक्षाने आपल्या नेत्यांना दिलेला दस्तऐवज अचानक लीक झाल्याचे सांगितले जात आहे. ट्विटरवर तो शेअर करताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा खोचक टीका करत म्हणाले की, “कॉंग्रेस संकटकाळात लोकांची अशाप्रकारे मदत करत आहे.”

    या ‘टूलकिट’मध्ये, कोरोना व्यवस्थापनात मोदी सरकारचे अपयश दाखवण्यासाठी कुंभमेळा, निवडणुका रॅली आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर दोषारोप करण्यात आले आहे. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात मोदी सरकारला कसे घेरले पाहिजे, हे नेत्यांना मुद्देसूद सांगण्यात आले आहे. तसेच हरिद्वारमधील कुंभ मेळ्याचे कोरोनाचा ‘सुपर स्प्रेडर’ असे वर्णन करत लिहिले की, भाजप स्वतःच्या फायद्यासाठी हिंदू धर्माचे राजकारण करत आहे.

    काय आहे या टूलकिटमध्ये?

    • या ‘टूलकिट’नुसार कॉंग्रेसने आपल्या नेत्यांना कुंभ मेळ्याला वारंवार ‘सुपरस्प्रेडर कुंभ’ म्हणून संबोधण्याची सूचना केली आहे. असे लिहिले आहे की, यामुळे लोकांना हे जाणवेल की भाजपची ‘हिंदू नीती’च सर्व समस्यांसाठी जबाबदार आहेत. यात असेही लिहिले आहे की, आंतरराष्ट्रीय मीडिया हे आधीच करत आहे. हेच नॅरेटिव्ह पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडिया आणि ‘पत्रकार मित्रा’शी ‘तडजोडी’ची चर्चादेखील झाली आहे.
    • ‘कॉंग्रेसच्या टूलकिट’नुसार कुंभावरील आरोपांचे उत्तर देण्यासाठी भाजप ईदचे नाव घेऊ शकते, परंतु दोन उत्सवांच्या तुलनेत आपण ‘सापळ्यात’ अडकणे टाळले पाहिजे. ईदसंदर्भात संपूर्ण शांतता घ्यावी व ईदविषयी जिथे चर्चा आहे, तेथे तुम्ही त्या पदापासून किंवा ट्विटपासून स्वत:ला वेगळे ठेवावे, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. तसेच वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ आणि बीबीसीसारख्या माध्यम संस्थांचे लेखदेखील शेअर केले गेले आहेत.
    • संबित पात्रा ज्याला कॉंग्रेसची ‘टूलकिट’ म्हणत आहेत, त्यात लिहिलंय की, “कुंभ हे एक राजकीय शक्तिप्रदर्शन आहे, असे चित्र काळजीपूर्वक समाजमाध्यमांवर रंगवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना प्रोत्साहित केले पाहिजे.” त्याच वेळी ईदमध्ये होणारी गर्दी ही विविध कुटुंब आणि समुदायांचा सुखद सोहळा आहे.” सोबतच कॉंग्रेसचे लोक या आपत्तीत सातत्याने लोकांची मदत करत आहेत, असे दर्शवण्यासही सांगण्यात आले आहे.
    • यासाठी लोकांना ‘मदत’कशी करावी हे टप्प्याटप्प्याने सांगण्यात आले आहे. पहिली पायरी म्हणजे सोशल मीडिया टीम तयार करणे आणि मदत मागणार्‍या लोकांना संदेश देणे. दुसऱ्या टप्प्यात त्यांना पुन्हा तेच पोस्ट करण्यास सांगितले जावे, पण युवा कॉंग्रेस आणि नेत्यांना टॅग करून. तिसरी पायरी म्हणजे ‘मित्र पत्रकारां’च्या मदतीने ती पोस्ट पुढे नेणे. यानंतरच्या टप्प्यात जे म्हटलंय ते धक्कादायक आहे.
    • या ‘टूलकिट’ मध्ये, लोकांच्या ‘मदती’साठी, कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये काही बेड्स आणि इतर सुविधा आधीपासून रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्या त्यांच्या नेत्यांच्या विनंतीवरूनच पुन्हा मिळाव्यात. पाचवा मुद्दा सूचित करतो की, IYCच्या हँडलला टॅग न करणाऱ्या पीडितांना कोणताही प्रतिसाद दिला जाऊ नये. पत्रकार, प्रभावशाली लोक आणि माध्यमातील लोकांच्या ‘मदती’ला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.
    • या ‘टूलकिट’ने असे गृहित धरले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अप्रूव्हल रेटिंग उच्च स्तराची आहे. आणि आपत्ती ‘गैरव्यवस्थापन’ असूनही याला कोणताही धक्का लागलेला नाही. काँग्रेस पक्षाने म्हटलंय की, हीच ती संधी आहे, जेव्हा त्यांची प्रतिमा धुळीस मिळवता येईल. असे हँडल्स बनवण्यास सांगण्यात आले आहे, जे दिसायला मोदी समर्थक दिसावे. मग त्याच हँडलवरून मोदी सरकारवर टीका करायची. विदेशी मीडियातही मोदींविरुद्ध आलेले लेख जोरदार शेअर करण्यास सांगण्यात आले आहे.
    • टूलकिटमध्ये असे म्हटले आहे की, परदेशी मीडिया आणि त्यांचे पत्रकार ज्या प्रकारे निरंतर जळणाऱ्या चिता आणि मृतदेहांचे फोटो शेअर करत आहेत, तसेच काहीसे जोरदार करायचे आहे. यासोबतच अशा ‘नाट्यमय’ छायाचित्रांना स्थानिक पत्रकारांना उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच भारताला बदनाम करण्यासाठी कोरोनाच्या इंडियन स्ट्रेन शब्दावलीचा वारंवार वापर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
    • या ‘टूलकिट’मध्ये बुद्धिजीवी आणि विचारवंतांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अपशब्द आणि आक्षेपार्ह भाषेचा प्रयोग करण्यास सांगण्यात आले आहे. कारण ते जनतेच्या मनात आहेत. भाजप नेत्यांना बदनाम करण्यासाठी अमित शाह यांच्यासाठी ‘मिसिंग’, एस. जयशंकर यांच्यासाठी ‘क्वारंटाइन’, राजनाथ सिंह यांच्यासाठी ‘साइडलाइन्ड’ आणि निर्मला सीतारामन यांच्यासाठी ‘संवेदनाहीन’, अशा शब्दांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
    • तसेच अशा नियतकालिकांच्या कव्हर स्टोरीज जोरदार शेअर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यात भाजपचे नेते किंवा सरकार ‘मिसिंग’ असे लिहिले आहे. तसेच पीएम मोदी यांना सतत पत्र लिहिण्यास सांगण्यात आले आहे. ‘पीएम केअर फंड’वर प्रश्न उपस्थित करण्यासाठी सिव्हिल सर्व्हंट्सकडून आवाज उठवण्याबाबत सांगण्यात आले आहे. यात असेही स्वीकारण्यात आले आहे की, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये ‘पीएम केअर फंड’मधून पाठविलेले व्हेंटिलेटर विनावापर पडून आहेत.
    • दरम्यान, या वृत्ताला छेद देण्यासाठी खोटे बोलण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, हे सर्व व्हेंटिलेटर्स खराब होते. पीएम केअर्सला बदनाम करण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते गोळा करून सातत्याने प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त करण्यासही सांगण्यात आले आहे. खोटे नॅरेटिव्ह तयार करून गुजरातला मोदी सरकार स्पेशल ट्रीटमेंट देत असल्याचेही दर्शवण्यास सांगण्यात आले आहे. तर इतर राज्यांच्या नागरिकांमध्ये असंतोष आणण्यासाठी हे वारंवार दाखवण्यास सांगण्यात आले आहे की, गुजरातव्यतिरिक्त इतर राज्यांना सापत्न वागणूक मिळत आहे.
    • तसेच ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ कसा बदनाम करायचा हेदेखील सांगण्यात आले आहे. सरकारने आधीच सांगितले आहे की, त्यांचे बजेट देशाच्या आरोग्य बजेटपेक्षा कित्येक पटीने कमी आहे आणि ते कित्येक वर्षे जुने आहे. ‘टूलकिट’ असे सुचवण्यात आले आहे की, ही रक्कम लोकांपर्यंत पोहोचविली पाहिजे, या रकमेसह 2 कोटी कुटुंबांना ‘न्याय योजने’अंतर्गत 6000 रुपये मिळतील. हा त्यांचा (मोदींचा) वैयक्तिक ‘व्हॅनिटी प्रोजेक्ट’ आहे, जनतेसाठी नाही, अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातही खटला दाखल करण्याचीही यात चर्चा आहे.

    तथापि, कॉंग्रेस पक्षाने या टूलकिटला फेक/बनावट म्हटले आहे आणि याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. एआयसीसी रिसर्च डिपार्टमेंटचे अध्यक्ष राजीव गौडा म्हणाले की, भाजप पसरवत असलेल्या या ‘फसव्या’ टूलकिटचा आणि कॉंग्रेसचा काहीही संबंध नाही. कॉंग्रेस पक्ष याविरुद्ध गुन्हा दाखल करेल. ते म्हणाले की, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रवक्ते संबित स्वराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

    (टीप : thefocusindia हा दावा करत नाही की, ही टूलकिट काँग्रेस पक्षाने तयार केली आहे. भाजप नेते आणि सोशल मीडियावर याला याच दाव्यानुसार शेअर केले जात आहे.)

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!