• Download App
    कुमार विश्वास म्हणतात, अरविंद केजरीवालांनी ठोकला होता खलिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानपदावर दावा!!Kumar Vishwas says that Arvind Kejriwal had claimed the post of the first Prime Minister of Khalistan

    कुमार विश्वास म्हणतात, अरविंद केजरीवालांनी ठोकला होता खलिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानपदावर दावा!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब मध्ये निवडणुकीचा प्रचार रंगात आलेला असताना राजकीय पक्षांचे सर्वच नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते कुमार विश्वास यांनी जोरदार तोफ डागली आहे.Kumar Vishwas says that Arvind Kejriwal had claimed the post of the first Prime Minister of Khalistan

    दिल्लीचे सध्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकदा मला म्हणाले होते, की ते स्वतः पंजाबचे मुख्यमंत्री तरी होतील किंवा स्वतंत्र खलिस्तानचा पहिले पंतप्रधान तरी होतील, असा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. आम आदमी पार्टीचा खरा चेहरा हा फुटीरतावादाचा आहे. हेच यातून दिसून येते. पंजाब मध्ये कशीही करून त्यांना सत्ता मिळवायची होती आणि आहे. याबद्दल मी अरविंद केजरीवाल यांना फॉर्म्युला विचारला, तेव्हा ते म्हणाले मी दोन समुदायांना आपापसात लढवेन. त्यामुळे मत विभाजन होऊन आम आदमी पार्टी जिंकेल आणि मी पंजाबचा मुख्यमंत्री होईन आणि तसे नाही झाले तर निदान स्वतंत्र देश खलिस्तानचा पहिला पंतप्रधान तरी होईन, असे अरविंद केजरीवाल म्हणाल्याचा दावा कुमार विश्वास यांनी केला आहे. कुमार विश्वास यांचा हा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

    आम आदमी पार्टी पंजाब मध्ये निवडणूक लढवत आहे. सर्व वृत्तवाहिन्यांच्या ओपिनियन पोल मध्ये आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून येत आहे. विद्यमान कॉंग्रेस सरकारला आम आदमी पार्टी जोरदार टक्कर देऊन सत्तेवर देखील येऊ शकते, असे काही ओपिनियन पोलचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट तोफ डागून कुमार विश्वास यांनी पंजाब आणि दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

    अर्थात अरविंद केजरीवाल यांनी आपण खलिस्तानचे पहिले पंतप्रधान होऊ असे विधान केले आहे का? याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. आम आदमी पार्टीने देखील याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.

    Kumar Vishwas says that Arvind Kejriwal had claimed the post of the first Prime Minister of Khalistan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार