• Download App
    उठा उठा निवडणूक आली; {खोटी ठरणारी} केतकरी भविष्यवाणी वाचण्याची वेळ झाली!! Kumar ketkar again predicts Modi Modi defeat in 2024, as in 2014 and 2019

    उठा उठा निवडणूक आली; {खोटी ठरणारी} केतकरी भविष्यवाणी वाचण्याची वेळ झाली!!

    नाशिक : उठा उठा निवडणूक आली, महिरपी कंसात {खोटी ठरणारी} केतकरी भविष्यवाणी वाचायची वेळ झाली!!… कारण कुमार केतकर यांनी 2014 आणि 2019 सारखीच 2024 ची भविष्यवाणी केली आहे… इथे महिरपी कंस मुद्दाम लिहून टाकला आहे, कारण भविष्यवाणी साधीसुधी नाही, ती केतकरी आहे!!Kumar ketkar again predicts Modi Modi defeat in 2024, as in 2014 and 2019

    तेव्हा नव्हते का?? कुमार केतकर यांनी केतकरी पठडीच्या भविष्यवाणीतून नरेंद्र मोदींना “हरविले” होते… तशीच “हार” पत्करण्याची वेळ कुमार केतकर यांच्या भविष्यवाणीने मोदींवर 2024 मध्ये देखील आणली आहे!!

    2014 आणि 2019 मध्ये केतकरी भविष्यवाणीनुसार मोदी जसे लोकसभेची निवडणूक “हरले” होते, तशीच 2024 ची निवडणूक देखील मोदी “हरणारच” आहेत. कारण नेमकी तीच भविष्यवाणी कुमार केतकर यांनी केली आहे.

    2014 मध्ये कुमार केतकर म्हणाले होते, मूळात काँग्रेस हरणारच नाही. त्यामुळे मोदी पंतप्रधान व्हायचा प्रश्नच नाही. पण 2014 मध्ये मोदी जिंकले आणि केतकर यांची भविष्यवाणी खोटी ठरली… पण हरकत नाही केतकर जरी नास्तिक असले, तरी त्यांच्या पहिल्या भविष्यवाणीचा डाव देवाला!!, म्हणूनच 2014 ची केतकरी भविष्यवाणी खोटी ठरली, तरी त्यांनी पुढची भविष्यवाणी करायचे टाळले नाही.

    2019 मध्ये कुमार केतकर म्हणाले होते, 2019 मध्ये मोदी निवडणूक जिंकणार नाहीत आणि ते निवडणूक जिंकले, तर भारतात पुन्हा कधीच निवडणुका होणार नाहीत. 2019 ची निवडणूक शेवटची ठरेल. पण 2019 मध्ये मोदी जिंकले. त्यानंतर गेल्या साडेचार वर्षांमध्ये सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका नियोजित वेळेनुसार पार पडल्या. 5 राज्यांच्या निवडणुका नोव्हेंबर – डिसेंबर 2023 मध्ये होणे अपेक्षित आहेत. त्यामुळे केतकर यांची 2019 ची भविष्यवाणी देखील खोटी ठरली.



    आता केतकर यांनी पुन्हा 2024 ची भविष्यवाणी केली आहे. 2024 मध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही. त्यांचे बहुमत 200 ते सव्वा 215 जागांपर्यंत खाली येईल, पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह तरी देखील सत्ता सोडणार नाहीत. त्यामुळे केंद्रात सत्ता संघर्ष अटळ आहे. पण या निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढतील, असे कुमार केतकर म्हणाले आहेत.

    त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्राची देखील राजकीय भविष्यवाणी वर्तविली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे तीन घटक पक्ष प्रत्येकी 16 जागांवर लोकसभा निवडणूक लढवतील. म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या 48 जागांवर समान जागा वाटप होईल, असे भविष्य केतकर यांनी वर्तविले आहे.

    अर्थातच महाविकास आघाडीचे प्रत्यक्ष जागावाटप होईपर्यंत केतकरांचे भविष्य खरेच ठरेल!!… आणि 2024 चा प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत त्यांचे लोकसभे संदर्भातले भविष्यही सत्यच ठरेल… नंतर काय होईल हा भाग अलहिदा… पण तोपर्यंत कदाचित त्यांनी 2029 ची अचूक भविष्यवाणी करण्यासाठी केतकरी पठडीचा विशेष अभ्यास सुरू केला असेल…!!

    Kumar ketkar again predicts Modi Modi defeat in 2024, as in 2014 and 2019

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य