वृत्तसंस्था
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि नर्सिंगच्या शेवटच्या वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.Kovid warriors to become future doctors, nurses;Even a government job if you serve 100 days
विद्यार्थ्यांना कोव्हिड योद्धे म्हणून दर्जा दिला जाणार आहे. तसेच कोरोना रुग्णांची 100 दिवस सेवा करणाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच आश्वासनही दिले.
देशात आणि राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. दुसरी लाट अधिकच धोकादायक झाली आहे. रुग्णसेवेत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला.
टेलिकंन्सल्टंट आणि कोरोनाची सौम्य लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या विद्यार्थ्याना नियुक्त करावे. अर्थात ज्येष्ठ डॉक्टरांच्या खाली त्यांनी काम करावे.
त्याद्वारे विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन आणि अनुभवही मिळेल. 100 दिवस काम करणाऱ्या प्रत्येकाला पंतप्रधान प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.