वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी बुधवारी रात्री शेकडो लोक रस्त्यावर उतरले. रात्री उशिरा राज्यभरात महिलांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक ठिकाणी लोकांनी निदर्शने केली. यावेळी कोलकात्याच्या ( Kolkata )आरजी कर मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ३० ते ४० हल्लेखोर घुसले. त्यांनी तोडफोड करत आंदोलकांना मारहाण केली.
याआधी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी बुधवारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या घटनेतील इतर आरोपींना अटक करण्याची मागणी केली. अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले की, पीडितेच्या शरीरात सुमारे १५० मिली वीर्य आढळले. यावरून तिच्यावर एकापेक्षा जास्त जणांनी अत्याचार केल्याचे दिसून येते. या याचिकेत असे आवाहन करण्यात आले आहे की, तपास सीबीआयकडे सोपवण्यापूर्वी पोलिसांनी संजय रॉय या आरोपीला अटक केली. परंतु या गुन्ह्यात तीन जणांचा सहभाग असल्याचे पुराव्यावरून दिसून येते. काही लोकांना वाचवण्यासाठी घाईघाईत शवविच्छेदन करण्यात आल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. दरम्यान, सीपीआयएम आणि भाजप बंगालमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी बांगलादेशसारखी निदर्शने करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
कोलकाता घटनेच्या पार्श्वभूमीवर आसामच्या सिल्चर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने बुधवारी महिला डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी जाणे टाळण्याची सूचना दिली. मात्र, विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर कॉलेजने ही सूचना मागे घेतली
बिहारमध्ये मुलीचे अपहरण, सामूहिक अत्याचारानंतर हत्या
महादलित कुटुंबातील १४ वर्षीय मुलीची सामूहिक अतयाचारानंतर हत्या केल्याचे प्रकरण तापले आहे. आरोपी संजय यादव ४ सहकाऱ्यांसह दोन दुचाकींवर ११ आॅगस्टला रात्री मुलीच्या घरी गेला आणि चाकूच्या धाकावर कुटुंबीयांसमोरच मुलीला ओढत नेले. सामूहिक अत्याचारानंतर तिला ठार मारले. दुसऱ्या दिवशी सरोवरात मुलीचे हातपाय बांधलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी सांगितले की, ४५ वर्षीय आरोपी पीडितेच्या गावातीलच आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तो या मुलीवर लग्नासाठी दबाव आणत होता. तिच्या आईला सुमारे सव्वा एकर जमीन ट्रॅक्टर देण्याचे आमिष दाखवले होते.
आंदोलन दडपण्यासाठी धुडगूस, पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले
महिला डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात आंदोलन तीव्र होत असताना काही गुंडांनी त्यात घुसून आंदोलक विद्यार्थी, विद्यार्थिनीवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेले विद्यार्थी जीव मुठीत धरुन पळू लागले असता गुंडांनी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घुसून त्यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयाला आगही लावली. गुंडांची दहशत इतकी हाेती की पोलिसही पळू लागले. नंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. रुग्णालयातील इमर्जन्सी वॉर्डचेही मोठे नुकसान केले.
Violence in Kolkata anti-rape-murder protest, protesting doctor attacked by gang of goons
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi : विकसित भारताचा संकल्प ते वैद्यकीय शिक्षणाच्या वाढीव 75000 जागा; लाल किल्ल्यावरून काय म्हणाले मोदी??; वाचा!!
- Sheikh Hasina : पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ
- Govind Mohan : वरिष्ठ आयएएस अधिकारी गोविंद मोहन यांची केंद्रीय गृहसचिव म्हणून नियुक्ती!
- Vinesh Phogat : CASने विनेश फोगटची केस फेटाळली, रौप्य पदक मिळणार नाही!