TMC MP Shantanu Sen Suspension : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून राज्यसभेत कागद हिसकावणारे तृणमूलचे खासदार शंतनू सेन यांना निलंबित करण्यात आले आहे, उर्वरित पावसाळी अधिवेशनात शंतनु सेन आता सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. निलंबनानंतर राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितले. Know About tmc mp shantanu sen suspension rajya sabha parliament union minister ashwini vaishnav
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून राज्यसभेत कागद हिसकावणारे तृणमूलचे खासदार शंतनू सेन यांना निलंबित करण्यात आले आहे, उर्वरित पावसाळी अधिवेशनात शंतनु सेन आता सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत. निलंबनानंतर राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांना सदनाबाहेर जाण्यास सांगितले.
राज्यसभेत सरकारने शुक्रवारी शांतनु सेन यांना सभागृहाच्या उर्वरित कामकाजापासून दूर ठेवण्याचा ठराव मांडला. सभापतींनी याच ठरावावर कारवाई केली आहे.
गुरुवारी तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी माहिती तंत्रज्ञान व दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून कागद हिसकावून घेतला आणि तो फाडून हवेत फेकला. केंद्रीय मंत्री वैष्णव त्यावेळी राज्यसभेत पेगॅसस सॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी केल्याच्या वृत्तांवर आणि या आरोपांविषयी निवेदन देत होते.
कोण आहेत शंतनू सेन?
कालपासून चर्चेत असलेले टीएमसीचे खासदार शांतनु सेन हे डॉक्टर आहेत. डॉक्टर शंतनू सेन हे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षही राहिलेले आहेत. उत्तर कोलकाता येथे राहणारे शंतनू एकेकाळी कोलकात्यात टीएमसीचे काउन्सेलरही होते. टीएमसीच्या खासदार शांतनु यांनी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील निवेदनाची प्रत हिसकावली आणि ती फाडून टाकली होती.
2016 मध्ये लढली होती विधानसभा निवडणूक
तृणमूल कॉंग्रेसने 2016च्या विधानसभा निवडणुकीत शांतनु सेन यांना मुर्शिदाबादच्या कांडी जागेवरून उमेदवारी दिली होती. परंतु शांतनु सेन यांना निवडणूक जिंकता आली नाही, तेव्हा कॉंग्रेस उमेदवाराने त्यांचा पराभव केला. यानंतर टीएमसीने शांतनु यांना राज्यसभेचे तिकीट दिले आणि ते राज्यसभेचे खासदार झाले.
शांतनु यांच्यावर कट मनीचा लागला होता आरोप
शांतनू सेन टीएमसीमध्ये एक सुशिक्षित आणि वादांपासून दूर राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्याच्यावर कोणताही गुन्हे दाखल नाही. पण 2019 मध्ये उत्तर कोलकाताच्या एका प्रवर्तकने शांतनु सेन त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचा आरोप केला.
आरोपानुसार जेव्हा शांतनु सेन काउन्सेलर होते, तेव्हा ते या भागात कट मनी गोळा करत होते. 2019 मध्येच ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे आवाहन केले होते की, टीएमसी नेत्यांनी कट मनी घेत असतील तर त्यांनी तो परत करावा. या आवाहनानंतर प्रवर्तक सुमंत्र चौधरी यांनी एक आरोप केला, जो त्यावेळी खूप चर्चेत आला होता.
तथापि, शांतनु सेन यांनी प्रवर्तकांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि प्रमोटरविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करण्याचेही वक्तव्य केले होते.
या एका प्रकरणाशिवाय शांतनु सेन कधीही फारसे वाद किंवा चर्चेतही नव्हते. तथापि, ते वैद्यकीय विषयावर टीएमसीच्या वतीने पत्र लिहिण्याचे किंवा सल्ला देण्याचे काम करत राहिलेले आहेत.
Know About tmc mp shantanu sen suspension rajya sabha parliament union minister ashwini vaishnav
महत्त्वाच्या बातम्या
- जन्मदर घसरल्याने इराणची वाढली चिंता नवीन, लोकांनी लग्न करावे म्हणून सरकारकडून ‘हमदम’ अॅप’ सुरू
- Tokyo Olympics : आजपासून खेळांचा महाकुंभ सुरू, २०५ देशांतील ११०० खेळाडूंचा सहभाग, भारताचे ८५ स्पर्धामध्ये आव्हान
- तालिबानने केली १०० अफगाणी नागरिकांची हत्या, स्पिन बोल्डक परिसरात भीषण हल्ले
- पुणे मेट्रोचे निम्मे काम पूर्ण; बुधवार पेठ स्थानकापर्यंत पोहोचले टनेल बोरिंग मशीन
- चीनमध्ये हजार वर्षांतील विक्रमी पाऊस, सुरक्षेसाठी चक्क धरणच फोडले