Kashi Corona Control Model : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काशी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांशी व्हर्च्युअली चर्चा केली. यात त्यांनी वाराणसीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलचे कौतुक केले. दुसरीकडे, डॉक्टरांनी मोदींसमोर एक सादरीकरण ठेवले. यामध्ये वाराणसीच्या बीएचयू येथील सर सुंदरलाल हॉस्पिटलचे अधीक्षक प्रा. के. के.गुप्ताही सामील होते. त्यांनी पंतप्रधानांना काशीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलविषयी माहिती दिली. Know About Kashi Corona Control Model Praised by PM Modi, How Kashi performed during second Wave Of Covid-19
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काशी येथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांशी व्हर्च्युअली चर्चा केली. यात त्यांनी वाराणसीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलचे कौतुक केले. दुसरीकडे, डॉक्टरांनी मोदींसमोर एक सादरीकरण ठेवले. यामध्ये वाराणसीच्या बीएचयू येथील सर सुंदरलाल हॉस्पिटलचे अधीक्षक प्रा. के. के.गुप्ताही सामील होते. त्यांनी पंतप्रधानांना काशीच्या कोरोना कंट्रोल मॉडेलविषयी माहिती दिली.
तीन महत्त्वाचे मुद्दे
- प्रा. गुप्ता म्हणाले, ‘मी पंतप्रधानांना सांगितले की आम्ही रुग्णांवर उपचार, लसीकरण आणि सूक्ष्म कंटेन्ट झोनच्या माध्यमातून संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी केले. यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी तळागाळातील स्तरावर मोठ्या टीमबरोबर काम केले. सूक्ष्म कंटेन्ट झोननेच संसर्गाचे प्रमाण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.’
- प्रो. गुप्ता म्हणाले की, लसीच्या व्हॉयलमध्ये 10 डोस असतात. आयुक्त दीपक अग्रवाल यांनी आम्हाला सूचित केले की लसीचा एक डोस दहा डोसनंतरही उरतोय. यासाठी आम्ही प्रशिक्षित नर्स देऊन कुपीमधील शिल्लक डोसही वापरला यामुळे लसीची नासाडी थांबली.
- प्रो. गुप्ता यांनी सांगितले की आम्ही मागील वर्षापासून कोरोनाच्या दुसर्या लाटेची अपेक्षा करत होतो. हे लक्षात घेता नोव्हेंबरमध्ये बीएचयू रुग्णालयात 20 हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट बसविला होता. यामुळे बीएचयू रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता कधीच नव्हती.
पंतप्रधानांनी दिल्या सूचना
प्रो. गुप्ता यांनी पंतप्रधानांना सांगितले की, कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेता ते मार्चपासून कार्यरत आहेत. मार्चमध्येच बीएचयू रुग्णालयाच्या सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकच्या तिसर्या मजल्यावरील-54 खाटांच्या बालरोग वार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. ते 100 बेडवर वाढविण्यात येत आहे. मुलांसाठी आयसीयू बेडची कोणतीही समस्या नाही. एनआयसीयूसाठीही व्यवस्था केली जात आहे.
यावर पंतप्रधान म्हणाले की बीएचयूमधील इतर रुग्णालयांमधील कर्मचार्यांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे. यावर गुप्ता म्हणाले की, बाह्य डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांनाही येथे प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था केली आहे.
कसे आहे काशीचे कोरोना कंट्रोल मॉडेल?
- काशीच्या मॉडेलमुळे एप्रिलमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण जे 35 ते 40 टक्क्यांपर्यंत गेले होते ते आता 3 टक्क्यांवर आले आहे.
- नियोजनानुसार रुग्णालयांमध्ये बेडची संख्या दररोज वाढविण्यात आली.
- खासगी रुग्णालयांच्या मनमानीस आळा घालण्यासाठी व औषधांचा काळा बाजार रोखण्यासाठी न्यायदंडाधिकारी नेमण्यात आले.
- सूक्ष्म कंटेनमेंट झोन तयार केले गेले.
- 438 सदस्यांच्या 174 देखरेख समित्या गठित केल्या. प्रत्येक समितीच्या सदस्यांना पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनर आणि औषधांची किट देण्यात आली.
- ट्रेसिंगमध्ये एक संशयित आढळल्याबरोबरच आरटीपीसीआर चाचणीही सुरू केली.
- स्मार्ट सिटी कंपनीचे सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर हे कोविड कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणून विकसित केले.
- कंटेनमेंट झोनच्या आढावा घेण्यासह सर्व कामांसाठी संबंधित विभागांचे डेस्क तयार केले गेले होते.
- घरात विलगीकरणात असलेल्यांसाठी आणि दूरध्वनीसाठी स्वतंत्र डेस्क तयार करण्यात आले होते.
- 4,525 कंटेनमेंट झोन आणि 109 दाट झोपडपट्ट्यांमध्ये नियमितपणे स्वच्छता करण्यात आली.
- सर्व विभागांच्या कार्यसंघाच्या कामाचा दररोज आढावा घेऊन सर्वांची जबाबदारी निश्चित करण्यात आली.
Know About Kashi Corona Control Model Praised by PM Modi, How Kashi performed during second Wave Of Covid-19
महत्त्वाच्या बातम्या
- बंगाल निवडणूक हिंसेमुळे एक लाख लोकांचे पलायन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
- DRDO चा आणखी एक आविष्कार, कोरोनावरील औषधानंतर अँटीबॉडी टेस्ट किट DIPCOVAN ची निर्मिती, संरक्षणमंत्र्यांनी केले कौतुक
- गौतम अदानी बनले आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत, एका वर्षात 33 अब्ज डॉलर्सची संपत्तीत वाढ
- नंदिग्रामच्या पराभवानंतर ममतांचे सावध पाऊल, आता भवानीपूरमधून लढणार पोटनिवडणूक, आ. शोभनदेव चटर्जींचा राजीनामा
- कोरोना काळात RBI ची केंद्र सरकारला मोठी मदत, सरप्लस अमाउंटमधून 99,122 कोटी हस्तांतरणाचा बोर्डाची मंजुरी