• Download App
    Amarinder Singh Profile : सैन्याचा राजीनामा दिलेला असून युद्धात गेले होते कॅप्टन, अशी आहे अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द । Know About Captain Amarinder Singh Political Profile Punjab EX CM

    Amarinder Singh Profile : सैन्याचा राजीनामा दिलेला असून युद्धावर गेले होते कॅप्टन, अशी आहे अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द

    Captain Amarinder Singh Political Profile : पंजाब काँग्रेसमधील बंडाने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची विकेट घेतली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढू लागला होता. एकीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धू हा संघर्ष महत्त्वाकांक्षेची लढाई म्हणून वर्णिला जात आहे. Know About Captain Amarinder Singh Political Profile Punjab EX CM


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील बंडाने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांची विकेट घेतली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंत्रिमंडळासह आपला राजीनामा राज्यपालांकडे सादर केला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढू लागला होता. एकीकडे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सिद्धू हा संघर्ष महत्त्वाकांक्षेची लढाई म्हणून वर्णिला जात आहे.

    विधानसभा निवडणुकांच्या बरोब्बर सहा महिने आधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे कॅप्टनविरुद्ध बंडाचे नेतृत्व करताना दिसले. काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहून कॅप्टनला हटवण्याची मागणी केली. त्याचबरोबर अनेक आमदार आणि नेत्यांचा गट कॅप्टनच्या बाजूने उभा आहे. शनिवारी संध्याकाळी काँग्रेस भवन येथे विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते विधिमंडळ गटाचा नेता निवडण्याचा अधिकार सोनिया गांधींवर सोपवण्यात आला आहे.

    कारण काहीही असो पण पंजाबमध्ये काँग्रेसला जीवदान देणाऱ्या ‘कॅप्टन’ यांना कमी समजू नये, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. नवज्योतसिंग सिद्धू त्यांच्या बंडखोर वृत्तीसाठी ओळखले जातात, परंतु पक्षाला राजकारणात कॅप्टनचाच मोठा आधार आहे किंवा होता.

    कॅ. अमरिंदर सिंग यांची राजकीय कारकीर्द

    कॅप्टन अमरिंदर सिंग यांची गणना काँग्रेसच्या सर्वात मजबूत नेत्यांमध्ये केली जाते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 117 पैकी 77 जागा जिंकल्या आणि 10 वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा जिवंत केले. मग पक्षाने केवळ शिरोमणी अकाली दलाचा पराभवच केला नाही, तर आम आदमी पक्षाची स्वप्नेही भंग केली.

    सैनिकी पार्श्वभूमी

    मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे पटियालाचे दिवंगत महाराजा यादविंदर सिंग यांचे सुपुत्र आहेत. लॉरेन्स स्कूल सनावर आणि देहरादूनच्या दून स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जुलै 1959 मध्ये त्यांनी एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश घेतला. डिसेंबर 1963 मध्ये तेथून पदवी प्राप्त केली आणि नंतर 1963 मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले. ते शीख रेजिमेंटमध्ये तैनात होते, ज्यात त्यांचे वडील आणि आजोबांनी सेवा दिली. राजकीय विश्लेषकांच्या मते, सैनिकी पार्श्वभूमीची व्यक्ती इतक्या लवकर हार मानणारी नाही.

    कॅप्टन यांना युद्धाचाही अनुभव

    अमरिंदर यांनी फील्ड एरिया-इंडो-तिबेटन बॉर्डरवर दोन वर्षे सेवा दिली आहे. मात्र, लष्करातील त्यांची कारकीर्द कमी होती. वडिलांची इटलीमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी 1965 च्या सुरुवातीला सैन्यातून राजीनामा दिला, कारण त्यांना घरी जाणे आवश्यक होते. तथापि, पाकिस्तानबरोबर युद्ध सुरू झाल्यानंतर लगेचच ते पुन्हा सैन्यात सामील झाले आणि युद्ध मोहिमांमध्ये भाग घेतला. युद्ध संपल्यानंतर त्यांनी 1966च्या सुरुवातीला पुन्हा राजीनामा दिला.

    कॅप्टन अमिरंदर यांचा स्वाभिमानी स्वभाव

    त्यांची राजकीय कारकीर्द खासदार म्हणून जानेवारी 1980 मध्ये सुरू झाली. स्वाभिमानी स्वभावाचे अमरिंदर 1984 मध्ये ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ दरम्यान लष्कराने सुवर्ण मंदिरात प्रवेश केल्याने दुखावले होते. त्यांनी लोकसभा सदस्यत्व आणि काँग्रेस पक्ष या दोन्हीचा निषेध म्हणून राजीनामा दिला. ऑगस्ट 1985 मध्ये ते अकाली दलात सामील झाले आणि त्यानंतर 1995 च्या निवडणुकीत ते लोंगोवालचे आमदार म्हणून निवडून आले. सुरजीत सिंह बर्नाला यांच्या सरकारमध्ये ते कृषिमंत्रीही होते. नंतर त्यांनी पंथिक अकाली दल स्थापन केले जे 1997 मध्ये काँग्रेसमध्ये विलीन झाले. तथापि, 1998 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर पटियालामधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले.

    दीर्घ काळापासून कॉंग्रेसी

    1999 ते 2002 पर्यंत ते काँग्रेसच्या पंजाब युनिटचे प्रमुख होते. 2002 मध्ये पक्षाने विधानसभा निवडणुका जिंकल्या आणि 2002 ते 2007 पर्यंत ते मुख्यमंत्री होते. जमीन हस्तांतरण प्रकरणात कथित अनियमिततेमुळे सप्टेंबर 2008 मध्ये त्यांना बडतर्फ करण्यात आले. तथापि, 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देताना त्यांची हकालपट्टी घटनाबाह्य ठरवली. त्यानंतर ते 2013 पर्यंत काँग्रेसचे प्रदेश प्रमुख होते. 2014 मध्ये, मोदी लाट असूनही त्यांनी लोकसभा निवडणुकीत अमृतसर मतदारसंघातून भाजप नेते अरुण जेटली यांचा एक लाख मतांच्या फरकाने पराभव केला. 2017 मध्ये पक्षाने त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि तेव्हापासून ते मुख्यमंत्री राहिले. कॅप्टन अमरिंदर हे अनेक पुस्तकांचे लेखकही आहेत.

    Know About Captain Amarinder Singh Political Profile Punjab EX CM

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!