विशेष प्रतिनिधी
मुंबई: डामडौल, झगमगाट आणि श्रीमंती आणि अंबानी हे समानार्थी आहेत असे म्हणायला हरकत नाही. सूत्रानुसार असे कळले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी त्यांची दिवाळी लंडनमध्ये साजरी करणार आहेत.
Know about Ambani’s country club home in London at rupees 592 crores
अंबानी कुटुंब त्यांच्या लंडनमधील बकिंगहॅम्पशायर येथील स्टोक पार्क येथे विकत घेतलेल्या तीनशे एकर जागेमध्ये कंट्री क्लब बनवणार असल्याचे कळाले आहे. त्यांच्या या घरामध्ये तब्बल ४९ खोल्या आहेत. ॲन्टीलिया येथील अल्टामौंट रोड होम येथे असलेल्या घरी त्यांनी कोरोना महामारीतील दिवस घालवले आहेत. हे त्यांचे घर तब्बल चार लाख स्क्वेअर फूट इतके आहे.
अंबानी यांना मोकळ्या जागेत आपली प्रॉपर्टी बांधायची इच्छा होती. अंबानी यांची दिवाळी मुंबईतील त्यांच्या घरामध्ये साजरी होते. पण यावेळेस ते आपल्या लंडनमधील जागेत दिवाळी साजरी करणार असल्याचे कळाले आहे. या प्रॉपर्टीमध्ये त्यांनी मेडिकल सेंटर म्हणजेच मिनी हॉस्पिटल बांधण्याचे ठरवले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यूकेमध्ये आणि दोन खाजगी हॉस्पिटल बांधण्याची अंबानींची योजना असल्याचे कळाले आहे. यापैकी एक हे बुटीक हॉस्पिटल असेल तर दुसरे हे अंडर-कन्स्ट्रक्शन आहे.
Know about Ambani’s country club home in London at rupees 592 crores
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे महापालिकेत महिलाराज ; नव्या सभागृहात ८७ नगरसेविकांचा पन्नास टक्के आरक्षणानुसार प्रवेश
- IND vs SCO T20 Playing 11: भारतीय संघाला स्कॉटलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवावा लागेल, ही शेवटची प्लेयिंग इलेव्हन असू शकते
- अनिल देशमुखांच्या कोठडीची मुदत संपण्यापूर्वी मुलगा ऋषिकेश देशमुखची ईडी चौकशी
- बीड : दिवाळी दिवशीच बस स्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न