• Download App
    दिल्ली हादरली : माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या, एक संशयित ताब्यात । Kitty Kumaramangalam Wife Of Late Former Union Minister P Rangarajan Kumaramangalam Was Murdered At Her Residence

    दिल्ली हादरली : माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या, एक संशयित ताब्यात

    Kitty Kumaramangalam :  देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये काल रात्री एक मोठी घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली आहे. किट्टी कुमारमंगलम हे दिल्लीच्या वसंत विहार भागात राहत होते. या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे दक्षिण पश्चिम दिल्लीचे पोलिस उपायुक्त म्हणाले. अधिक तपास सुरू आहे. Kitty Kumaramangalam Wife Of Late Former Union Minister P Rangarajan Kumaramangalam Was Murdered At Her Residence


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशाच्या राजधानी दिल्लीमध्ये काल रात्री एक मोठी घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांच्या पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची त्यांच्या घरात हत्या करण्यात आली आहे. किट्टी कुमारमंगलम हे दिल्लीच्या वसंत विहार भागात राहत होते. या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे दक्षिण पश्चिम दिल्लीचे पोलिस उपायुक्त म्हणाले. अधिक तपास सुरू आहे.

    काल रात्री नऊच्या सुमारास धोबी घरी आला असता, मोलकरणीने दार उघडले. मोलकरणीला जबरदस्तीने एका खोलीत डांबण्यात आले होते. त्यादरम्यान आणखी दोन मुले आली आणि त्यांनी किट्टी यांचा गळा दाबला. हत्येनंतर तिघेही पळून गेले. घटनेनंतर मोलकरणीने आरडाओरड केली.

    रात्री 11च्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपींच्या शोधात पथके रवाना करण्यात आली. मोलकरणीच्या जबाबानंतर पोलिसांनी रात्रीच धोब्याला अटक केली त्याचे नाव राजू आहे. 24 वर्षीय राजू वसंत विहारच्या भंवरसिंग कॅम्पमध्ये राहत होता. या घटनेत सामील झालेल्या उर्वरित दोन आरोपींचीही ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. त्याच वेळी, पोलिसांनी असे म्हटले आहे की, 67 वर्षीय किट्टी कुमारमंगलम यांची हत्या चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या आरोपींनी केली आहे.

    Kitty Kumaramangalam Wife Of Late Former Union Minister P Rangarajan Kumaramangalam Was Murdered At Her Residence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले