Thursday, 8 May 2025
  • Download App
    किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा सलग दुसऱ्या वेळा कोरोना संक्रमणामुळे पुन्हा स्थगित । kishor vaidnyanik protsahan yojna exam is postponed again for the second time in a row due to corona infection

    किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा सलग दुसऱ्या वेळा कोरोना संक्रमणामुळे पुन्हा स्थगित

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर : किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा (KVPY) सलग दुसऱ्या वेळा कोरोना संक्रमणामुळे स्थगित करण्यात आली आहे. येत्या रविवारी (ता. ९) ही परीक्षा देशभर घेण्यात येणार होती. kishor vaidnyanik protsahan yojna exam is postponed again for the second time in a row due to corona infection

    किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा सलग दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा ७ नोव्हेंबरला होणार होती. पण, ती कोरोनामुळे स्थगित करून ९ जानेवारीला घेण्याचे जाहीर केले होते. दोन्ही परीक्षेसाठी हॉल तिकिटाचे वाटपही करण्यात आले होते. पण, ऐन परीक्षेच्या तोंडावरच कोरोनाने डोके वर काढल्याने ही परीक्षाच स्थगित करण्याचा निर्णय आयआयएससीला घ्यावा लागला आहे. भारतीय विज्ञान संस्थान (आईआईएससी), बंगळूरूच्या पोर्टलवर परीक्षा स्थगित केल्याची माहिती दिली आहे.



    मुलांना विज्ञानाची गोडी लागावी. ते संशोधक बनावेत, यासाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन परीक्षा घेतली जाते. पण, सलग दोनदा या परीक्षेला कोरोनामुळे नाट लागला आहे. आता परीक्षेचे नवे वेळापत्रक केव्हा जाहीर होणार ? याकडे विद्यार्थ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

    kishor vaidnyanik protsahan yojna exam is postponed again for the second time in a row due to corona infection

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये जवानांनी २२ नक्षलवाद्यांना केले ठार, १८ जणांचे मृतदेह सापडले

    Singer Adnan Sami : गायक अदनान सामीचा खुलासा- पाकिस्तानी मुले त्यांच्या सैन्याचा तिरस्कार करतात; देश उद्ध्वस्त केल्याचा आरोप

    Rashid Alvi : ‘प्रत्येक दहशतवादी मारला गेला का, दुसरा पहलगाम होणार नाही?’