विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल करत दोन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि डी. पुरंदरेश्वरी यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या सुनील जाखड यांच्याकडे पंजाब प्रदेश भाजपची जबाबदारी सोपवली आहे. बाबूलाल मरांडी या जुन्या जाणत्या नेत्याला झारखंड प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.Kishan Reddy, Purandareshwari, two Union Ministers, State Presidents of BJP; Chance for Babulal Marandi, Sunil Jakhar!!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कामराज योजना राबवत दोन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे तेलंगण, तर डी. पुरंदरेश्वरी यांच्याकडे आंध्र प्रदेश या राज्यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने 4 राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत.
सोमवारी, प्रगती मैदानातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट सहकाऱ्यांसोबत 5 तासांची बैठक घेतली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत गेल्या 4 वर्षांतील विविध मंत्रालयांच्या कामकाजाबाबतही चर्चा झाली. सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्र्यांना उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
विविध मंत्रालयांच्या कामकाजावर पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या यशावर पंतप्रधान म्हणाले की, यामागचे खरे कारण हे आहे की भाजपने अनेक दशकांपासून लोकांची जी उपेक्षा दूर केली आहे. तुम्हाला भविष्यातही असेच करावे लागेल.
Kishan Reddy, Purandareshwari, two Union Ministers, State Presidents of BJP; Chance for Babulal Marandi, Sunil Jakhar!!
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादी फुटली; वसंतदादांच्या आत्म्याला चिरशांती मिळाली असेल; शालिनीताईंचा पवारांना टोला
- “केवळ महाराष्ट्रच नाही, तर उत्तर प्रदेशातही होऊ शकतो मोठा खेळ’’
- राष्ट्रवादीतल्या सिंडिकेट – इंडिकेट संघर्षात शरद पवारांना त्यांच्या गटाचे समर्थन जरूर, पण महाराष्ट्रात सहानुभूती का नाही??
- Land for Job Scam : तेजस्वी यादव यांच्या विरोधात CBI कडून आरोपपत्र दाखल!