योजनेंतर्गत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाईल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : kisan Sanman Nidhi पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोडो शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. ते किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता जारी करतील. शेतकऱ्यांना आतापर्यंत 17 हप्ते जमा झाले आहेत. पुढील हप्ता आज (५ ऑक्टोबर) प्रसिद्ध जारी होणार आहे.kisan Sanman Nidhi
योजनेंतर्गत 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जाईल. 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याचे विमोचन करणार आहेत.
वाशिम जिल्हा प्रशासनाने अधिकृत पत्रकात म्हटले आहे की, या कार्यक्रमांतर्गत देशभरातील 9.4 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे 20 हजार कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.
kisan Sanman Nidhi 18th installment to be released by Modi
महत्वाच्या बातम्या
- Jaishankar : परराष्ट्र मंत्री जयशंकर पाकिस्तानला जाणार, 15-16 ऑक्टोबरला SCO बैठकीत सहभागी होणार
- NCP : पवारांचा पक्ष लढवणार 80 ते 85 जागा; इच्छुकांच्या मुलाखती घेणार 24 नेत्यांचे पार्लमेंटरी बोर्ड!!
- Siddaramaiah : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यानंतर MUDA घोटाळ्यात आणखी एक काँग्रेस मंत्री अडकले
- Israel Iran war : इस्रायल-इराण युद्धादरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने दिली मोठी धमकी