• Download App
    शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला होणार सहा महिने पूर्ण, काळा दिन पाळण्याची किसान मोर्चाची घोषणा|Kisan Morcha declares new andolan

    शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला होणार सहा महिने पूर्ण, काळा दिन पाळण्याची किसान मोर्चाची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी २६ मे रोजी काळा दिन पाळला जाणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आज जाहीर करण्यात आले.Kisan Morcha declares new andolan

    कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास त्या दिवशी सहा महिने पूर्ण होत आहे.मागील सहा महिन्यांच्या काळामध्ये या आंदोलनाने वेगवेगळी वळणे घेतली.



    यामुळे तिकरी, सिंघू आणि गाझीपूर हा सीमाभाग हा आंदोलनाचा केंद्रबिंदू बनले.शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले की सर्व शेतकऱ्यांनी २६ मे रोजी आपले घर, वाहने आणि दुकाने यांच्यावर काळे झेंडे लावून कृषी कायद्यांचा विरोध करावा.

    आंदोलनास येत्या २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत असून केंद्रामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन होऊन सात वर्षे पूर्ण होत आहे. हा दिवस काळा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. देशभरातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यावा,

    Kisan Morcha declares new andolan

    Related posts

    Golden Temple : सुवर्ण मंदिरावर पुन्हा बॉम्ब हल्ल्याची धमकी; 24 तासांत आणखी एक ई-मेल

    PM Kisan : किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता या आठवड्यात येण्याची शक्यता; PM मोदी 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात करणार ट्रान्सफर

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार