विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रातले मोदी सरकार Waqf board सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडणार आहे. त्यावरच्या चर्चेसाठी सभापतींनी आठ तासांचा कालावधी निश्चित केला, पण सभापतींनी हा निर्णय देताच विरोधकांनी आजच सभात्याग करून ते मोकळे झाले.
केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषद घेऊन संसदेतल्या कामकाजाची माहिती दिली. केंद्र सरकारने उद्या 2 एप्रिल 2025 रोजी Waqf board सुधारणातील लोकसभेत मांडायचा निर्णय घेतलाय. सर्व विरोधकांना लोकसभेच्या सभागृहात आणि राज्यसभेच्या सभागृहात आपापली जी काही मते मांडायचीत, ती मांडायची मुभा मिळणार आहे.
संसदेच्या सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार सभापतींनी संबंधित विधेयकावर आठ तासांची चर्चा निर्धारित केली आहे. काही सदस्यांनी चार तास, तर काही सदस्यांनी सहा तास चर्चा व्हावी असे सुचवले होते, तर विरोधकांनी 12 तासांच्या चर्चेची मागणी केली. शेवटी सभापतींनी आठ तास चर्चा होईल असे जाहीर केले, पण त्याचवेळी त्यांनी सदनाचे मत लक्षात घेऊन चर्चेचा कालावधी वाढवता देखील येईल, असे स्पष्ट केले. परंतु, विरोधकांनी आजच सभात्याग केला, असे किरण रिजिजू पत्रकार परिषदेत म्हणाले.
Waqf board सुधारणा बिलाला कोणत्या राजकीय पक्षाने विरोध केला आणि कोणत्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला याची नोंद संसदेच्या इतिहासात होणार आहे त्यामुळे सगळ्या सदस्यांनी आवर्जून संबंधित विधेयकाच्या चर्चेत भाग घ्यावा असे आवाहन किरण रिजिजू यांनी पुन्हा केले. पण रिजिजू यांचे न ऐकताच विरोधकांनी आजच सभात्याग केला.
Waqf board सुधारणा कायदा आणण्यात मोदी सरकारचा इरादा गैर असल्याचा आरोप विरोधकांनी केला. यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रविड मुन्नेत्र कळघम आदी पक्षांच्या खासदारांचा समावेश होता.
Kiren Rijiju says, “In the Business Advisory Committee (BAC) meeting of Lok Sabha
महत्वाच्या बातम्या
- Tamil Nadu तामिळनाडूमध्ये भाजप मोठ्या आघाडीच्या तयारीत!
- आधुनिक काळात कुटुंब व्यवस्था धोक्यात, ही राष्ट्रहिताच्या दृष्टीने धोक्याची घंटा; सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचा इशारा!!
- Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये 17 नक्षली ठार; यात 11 महिला, कुख्यात कमांडरही मारला गेला
- Myanmar : म्यानमारमध्ये २४ तासांत १५ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले