काँग्रेसला सोडचिठ्ठी देत जूनमध्ये त्यांनी मुलगी श्रुती चौधरीसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणात काँग्रेसचे चार वेळा आमदार राहिलेल्या किरण चौधरी( Kiran Chowdhury ) यांनी मंगळवारी विधानसभेचा राजीनामा दिला. हरियाणातील एकमेव राज्यसभेच्या जागेसाठी त्या भाजपच्या उमेदवार असतील. जूनमध्ये त्यांनी मुलगी श्रुती चौधरीसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.
विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लोकसभेवर निवडून आल्यानंतर काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनी राज्यसभेची जागा सोडली होती. भाजप राज्यसभेच्या जागेसाठी किरण चौधरी यांच्या नावाची घोषणा करू शकते, असे मानले जात आहे.
2019 मध्ये तोशाम, भिवानी येथून काँग्रेस आमदार म्हणून निवडून आलेल्या किरण चौधरी या हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सून आहेत. किरण चौधरी यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. काँग्रेसने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. ९० सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसकडे बहुमत नाही. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी उमेदवाराला ४४ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.
Kiran Chowdhury resigned from MLA In Haryana
महत्वाच्या बातम्या
- Eknath shinde : मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता
- Narendra modi :पंतप्रधान मोदी जगाला चकित करणार, रशियानंतर आता थेट युक्रेनला जाणार!
- Monkey Pox Principal Secretary : ‘मंकी पॉक्स’बाबत मोठी बैठक, प्रधान सचिव म्हणाले परिस्थितीवर पंतप्रधानांची नजर!
- Vishwa Hindu Parishad : मागासवर्गीयांना आपलेसे करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची देशभरात तब्बल 9000 ब्लॉक मध्ये धर्मसभा आणि संमेलने!!