• Download App
    बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे यू ट्यूब सेलीब्रिटी शिक्षक खान सर, हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल|Khan Sir, YouTube celebrity teacher behind Bihar student agitation, charges filed for inciting violence

    बिहारमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे यू ट्यूब सेलीब्रिटी शिक्षक खान सर, हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा: रेल्वे भरती बोडार्तील नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीसाठी भरती परीक्षेच्या निकालाविरोधात उमेदवारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. बिहारमध्ये अनेक ठिकाणी रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे गया येथे बुधवारी एक पॅसेंजर ट्रेन पेटवून देण्याचा प्रकारही घडला. या हिंसाचारामागे यू ट्यूब सेलीब्रिटी शिक्षक खान सर यांची चिथावणी असल्याचे समोर आले आहे.Khan Sir, YouTube celebrity teacher behind Bihar student agitation, charges filed for inciting violence

    पाटण्यातील शिक्षक आणि युट्युबर खान सर यांच्यासह अनेक कोचिंग क्लासेसवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारांचे आंदोलन भडकले असतानाच खान सर (फैजल खान) यांनी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात या संपूर्ण आंदोलनासाठी त्यांनी रेल्वे भरती बोडार्ला दोष दिला होता.



    ‘आरआरबीने १६ फेब्रुवारीपर्यंत सर्व उमेदवारांकडून सूचना मागवल्या आहेत. हे एक चांगले पाऊल आहे. मात्र, हा निर्णय १८ जानेवारीलाच घेतला असता तर आंदोलनाचा भडका उडाला नसता’, असे खान सर म्हणाले होते.

    खान सर यांच्या व्हिडिओने विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याचा आरोप असून त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय रेल्वे भरतीशी संबंधित क्लासेस चालवणाऱ्या अन्य काही संस्थांसह एकूण ४०० जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पत्रकार नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    स्पर्धा परीक्षा तसेच रेल्वेसह इतर भरती परीक्षांबाबत खान सर हे क्लासेस घेतात. पाटण्यात ते प्रसिद्ध आहेत. युट्युबर अशीही त्यांची ओळख आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द केल्या गेल्या नाहीतर आंदोलन करा, असे आवाहन करणारा व्हिडिओ त्यांनी जारी केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उमेदवार आक्रमक झाले व हिंसक आंदोलन सुरू झाले, असा आरोप खान सर यांच्यावर आहे.

    आरआरबीने एनटीपीसी भरती सीबीटी-१ परीक्षेचे निकाल १४ आणि १५ जानेवारी रोजी जाहीर केले. या निकालांच्या आधारावर सीबीटी-२ म्हणजेच पुढच्या टप्प्यातील परीक्षेसाठी उमेदवारांची यादी तयार केली जाणार आहे. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा उमेदवारांचा आरोप आहे. त्यामुळेच बिहारमधील विविध भागांत उमेदवारांनी आंदोलन सुरू केले आहे.

    बुधवारी गया जिल्ह्यात एक पॅसेंजर ट्रेन पेटवून देण्यात आली. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीचं आवाहन करत अशाप्रकारे हिंसक आंदोलन करू नये अशी विनंती केली व कठोर कारवाईचा इशाराही दिला.

    Khan Sir, YouTube celebrity teacher behind Bihar student agitation, charges filed for inciting violence

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार