विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कृषि कायद्यांच्या विरोधातील आंदोलनाला खलिस्थानवाद्यांची सहानुभूती असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना धमकी देणारे रेकॉर्ड केलेले दूरध्वनी मंगळवारी सकाळी हरयाणा आणि एनसीआर जिल्ह्यांमधील लोकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आले. मात्र, फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज असल्याच्या शब्दांत मनोहरलाल खट्टर यांनी त्यांना ठणकावले आहे.Khalistanis threaten Haryana CM, we are ready to face separatists,” Khattar said.
धमकी देणाऱ्याच्या बोलण्याचा आवाज एकाच प्रकारचा आहे, पण हे फोन कॉल्स वेगवेगळ्या क्रमांकांवरून येत आहेत. हे कॉल एकदा नव्हे तर दोनदा अर्ध्या तासाच्या कालावधीत आले. याबाबत सरकारने याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. धमकीचा दूरध्वनी करणारा कोण हे शोधण्यासाठी हरयाणा सीआयडी विभाग कामाला लागला आहे.
दूरध्वनीमधील आवाज गुरपतवंतसिंग पन्नूचा असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, याच पन्नूने काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही धमकी दिली होती.
शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ यंदा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना १५ ऑ गस्ट रोजी तिरंगा फडकवू देणार नाही, असे धमकी देणाऱ्याने सांगितले.
समाजमाध्यमांवर लोकांना भडकवल्याबद्दल आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल सध्या तुरुंगात असलेले शेतकरी नेते दलबीरसिंग यांच्या नियमित जामिनाच्या मागणीवर उच्च न्यायालय सुनावणी झाली. नेमक्या याच वेळेस हे धमकीचे फोन आले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना धमकी देणाºया फोन कॉल्सच्या दरम्यान, खलिस्तानवादी भिंद्रानवालेच्या तथाकथित आवाजातील संदेशही ऐकू येतो.
याबाबत मुख्यमंत्री खट्टर म्हणाले, १५ ऑ गस्ट संदभार्तील धमकीच्या फोनची मला माहिती आहे. मला थेट असा कोणताही फोन आलेला नाही. पण फुटीरवाद्यांशी सामना करण्यास आम्ही पूर्ण सज्ज आहोत. पन्नूचा विषय खूप जुना आहे. आम्ही फुटीरवाद्यांना डोके वर काढू देणार नाही. खलिस्तान समर्थकांचे कठोरपणे निर्दालन करण्यासाठी हरयाणा पोलिस पूर्णपणे सज्ज आहेत.
Khalistanis threaten Haryana CM, we are ready to face separatists,” Khattar said.
महत्त्वाच्या बातम्या
- इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका फेटाळली, प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी म्हणत याचिकाकर्त्याला दहा हजार रुपयांचा दंड
- झाशीच्या राणीला योगी आदित्यनाथांचे अभिवादन, झाशी रेल्वे स्टेशनला देणार वीरांगणा लक्ष्मीबाई यांचे नाव
- कंगाल पाकिस्तान : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पाकने पंतप्रधानांचे निवासस्थान काढले भाड्याने, गेस्ट हाऊसपासून लॉनपर्यंत रेंटने मिळणार
- आता मध्य प्रदेशात पावसाचा कहर : पुराच्या विळख्यात 1171 गावे, बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण