• Download App
    खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ व्हायरल; संसद भवनावर हल्ल्याचा दिला इशारा!|Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannus video goes viral Warning of an attack on the Parliament building

    खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा व्हिडिओ व्हायरल; संसद भवनावर हल्ल्याचा दिला इशारा!

    • ‘दिल्ली बनेगी पाकिस्तान, असंही म्हणाला आहे.

    नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारतात हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्याने एक व्हिडिओ जारी करून ही धमकी दिली आहे ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, आपल्याला मारण्याचा कट फसला आहे, आता 13 डिसेंबरला किंवा त्यापूर्वी भारतीय संसदेचा पाया डळमळीत होईल. त्याने 13 डिसेंबरचा उल्लेख यासाठी केला कारण या तारखेला 2001 मध्ये संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannus video goes viral Warning of an attack on the Parliament building



    या व्हिडिओमध्ये एका बाजूला खलिस्तानचा झेंडा आणि दुसऱ्या बाजूला संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचे पोस्टर आहे. ज्यावर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ असे लिहिले होते. व्हिडिओमध्ये पन्नू म्हणत आहेत, “भारतीय एजन्सींनी मला मारण्याचा कट रचला आणि तो अयशस्वी झाला. आता 13 डिसेंबर किंवा त्यापूर्वी संसदेवर हल्ला करून याचे प्रत्युत्तर दिले जाईल. त्याचवेळी खबरदारी घेत सुरक्षा यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

    खरं तर, नुकतेच अमेरिकन गुप्तचर संस्थांनी निखिल गुप्ता नावाच्या व्यक्तीला अटक केली आणि आरोप केला की गुरपतवंत सिंगच्या हत्येचा कट भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यावरून रचला गेला आणि निखिल गुप्ता या एजन्सींच्या सांगण्यावरून काम करत होता.

    यानंतर भारताने हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली. गुरुपतवंत सिंगकडे कॅनडा आणि अमेरिका या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे आणि येथून तो व्हिडीओ बनवून भारताला धमकावत असतो.

    Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannus video goes viral Warning of an attack on the Parliament building

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!