अमृतपाल भारत आणि विदेशातील शीख समुदायाला अन्यायाच्या विरोधात लढण्याचं आवाहन करत आहे.
विशेष प्रतिनिधी
Amritpal Singh Video: ‘वारीस पंजाब दे’चा प्रमुख आणि खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने पोलिसांपासून फरार असतानाचा स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. त्याने व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पंजाब सरकार आणि पोलिसांवर टीका केली आहे आणि श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना आवाहन केले आहे. Khalistani Radical Amritpal Singh releases a new video from hiding in Punjab
अमृतपाल भारत आणि विदेशातील शीख समुदायाला अन्यायाच्या विरोधात लढण्याचं आवाहन करत आहे. हा व्हिडीओ एक ते दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, हा व्हिडीओ ज्या युट्यूब चॅनेलवरून प्रसिद्ध झाला, त्यावर सरकारने बंदी घातली आहे.
व्हिडिओमध्ये अमृतपालने श्री अकाल तख्त साहिबच्या जथेदारांना बैसाखीच्या दिवशी सरबत खालसा बोलावण्याचे आवाहन केले आहे. जातीय प्रश्न सोडवण्यासाठी सरबत खालसा बोलवावा, असे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर जारी झालेल्या व्हिडिओमध्ये अमृतपाल सिंग काळी पगडी आणि शाल परिधान केलेला दिसत आहे.
‘मला अटक करण्याचा पंजाब सरकारचा हेतू असता तर…’
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये अमृतपालने म्हटले आहे की, “जर पंजाब सरकारचा मला अटक करायचा हेतू असेल तर पोलीस माझ्या घरी आले असते आणि मी त्याला होकार दिला असता.” अमृतपाल याने पंजाब पोलिसांवर शीख तरुणांना अटक केल्याची टीकाही केली आहे.
विशेष म्हणजे १८ मार्च रोजी पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या संघटनेच्या ‘वारीस पंजाब दे’ विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यानंतर अमृतपालबद्दल अनेक अपडेट्स आले आहेत. दरम्यान, पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेजही जारी केले, ज्यामध्ये अमृतपाल वेगवेगळ्या वेषात दिसत होता.
Khalistani Radical Amritpal Singh releases a new video from hiding in Punjab
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!
- कुनो नॅशनल पार्कमधून आली GOOD NEWS; नामिबियातून आणलेल्या चित्ता सियायाने दिला चार पिल्लांना जन्म
- Girish Bapat Passed Away : राजकारणातील विरोधक परंतु तितकाच घनिष्ठ मित्र; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे माध्यमांसमोर रडले
- डर गए… अंगलट येताच राहुल गांधी घाबरले? सावरकरांवरील सर्व ट्विट डिलीट केल्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!