• Download App
    पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट : केतकी चितळेला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी; न्यायालयात स्वतःच केला युक्तिवाद Ketki Chitale remanded in police custody till May 18

    अभिव्यक्ती स्वातंत्र्य माझा अधिकार…पोस्ट डिलीट करणार नाही! स्वतःच युक्तिवाद करण्याऱ्या केतकी चितळेला १८ मेपर्यंत कोठडी

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 18 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. Ketki Chitale remanded in police custody till May 18

    शरद पवारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह पोस्टसंदर्भात केतकी चितळे विरोधात पोलिसांनी तिच्या विरोधात 9 ठिकाणी गुन्हे दाखल केले होते. ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांच करीत असताना रविवारी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत कुठेही ठेवण्याचा निर्णय दिला.



    केतकीने न्यायालयात वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. या पोस्टबाबत अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. ठाणे गुन्हे शाखेने 5 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी देखील केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले असल्याचे सांगितले जात आहे.

    न्यायालयात केतकीने काय सांगितले?

    संबंधित पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल केतकीने केला. केतकीने सुनावणीत वकील घेतला नाही, तिने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. केतकीने सांगितले की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे.

    नेमकी काय आहे पोस्ट?

    तुका म्हणे पवारा| नको उडवू तोंडाचा फवारा| ऐंशी झाले आता उरक| वाट पाहातो नरक| सगळे पडले उरले सुळे| सतरा वेळा लाळ गळे| समर्थांचे काढतो माप| ते तर तुझ्या बापाचेही बाप| ब्राम्हणांचा तुला मत्सर| कोणरे तू| तू तर मच्छर| भरला तुझा पापघडा| गप नाही तर होईल राडा| खाऊन फुकटचं घबाड| वाकडं झालं तुझं थोबाड| याला ओरबाड त्याला ओरबाड| तू तर लबाडांचा लबाड| …

    अशी ही पोस्ट आहे.

    Ketki Chitale remanded in police custody till May 18

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!