• Download App
    केरळचे नाव बदलणार? पिनाराई विजयन सरकारने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव Keralas name will be changed the Pinarayi Vijayan government has sent a proposal to the Centre

    केरळचे नाव बदलणार? पिनाराई विजयन सरकारने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव!

    जाणू घ्या, कोणत्या नावाची केली आहे शिफारस?

    विशेष प्रतिनिधी

    तिरुवनंतपुरम : केरळ राज्याच्या नावात बदल होऊ शकतो. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी बुधवारी विधानसभेत राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मांडला. तसा प्रस्तावही मंजूर झाला आहे. आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. Keralas name will be changed, the Pinarayi Vijayan government has sent a proposal to the Centre

    सीएम पिनराई यांनी आज विधानसभेत सांगितले की, ‘नियम 118 अन्वये या सभागृहात प्रस्ताव आणला जात आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे अधिकृत नाव बदलून ‘केरळम’ करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्यात आली आहे.

    डाव्या सरकारचा हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यूडीएफ (युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट) या राज्यातील विरोधी आघाडीने कोणतीही सुधारणा किंवा बदल न सुचवता ते स्वीकारले. मुख्यमंत्री सीएम पिनराई म्हणाले की, आपल्या मल्याळम भाषेत याला ‘केरळम’ म्हणतात तर इतर भाषांमध्ये केरळ म्हणतात.

    केरळमध्ये १ नोव्हेंबरपासून ‘केरळीम’ जागतिक स्तरावर साजरा होणार आहे. याआधी मंगळवारी केरळ विधानसभेने देशात समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या निर्णयाविरोधात एकमताने ठराव मंजूर केला.

    Keralas name will be changed the Pinarayi Vijayan government has sent a proposal to the Centre

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!