वाद सोडवण्यासाठी गेलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या आईलाही केली मारहाण; गुन्हा दाखल
प्रतिनिधी
केरळ : केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवरील हल्ले अद्यापही सुरूच आहेत. काल रात्री पलक्कड जिल्ह्यातील अलाथूर येथे भाजपाचे दोन कार्यकर्ते विष्णू आणि दिनेश यांच्यावर शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. एवढंच नाही तर मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विष्णूच्या आईवरही हल्ला करण्यात आला. Kerala Two BJP workers attacked in Palakkad police register case
या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अलातुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.