विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळ विधानसभा निवडणुकीत डावी लोकशाही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा अंदाज एक्सिट पोलमध्ये व्यक्त केला. Kerala The Focus India Exit Poll Results 2021
केरळमध्ये १४० विधानसभा मतदारसंघांत निवडणूक पार पडल्या. राज्यात ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. केरळमध्ये जवळपास ७० टक्के मतदानाची नोंद झाली.
डावी लोकशाही आघाडी (एलडीएफ), काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडी ( युडीएफ) आणि भाजप यांच्या लढत आहे. पी. विजयन यांच्या नेतृत्वाखाली डावी आघाडी रिंगणात आहे. भाजपने मेट्रो मॅन इ श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. त्याचा नेमका किती परिणाम झाला हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.