वृत्तसंस्था
तिरुअनंतपुरम : धर्मांतर करून ख्रिश्चन बनल्यावर हिंदू अनुसूचित जातीच्या राखीव जागेवरून निवडणूक नाही लढवू शकत, असे सांगत केरळ हायकोर्टाने केरळमधील ख्रिश्चन आमदार ए. राजा यांची आमदारकी रद्द केली आहे. काँग्रेसचे उमेदवार के. कुमार यांनी त्यांच्याविरुद्ध केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती. Kerala HC Cancels Election of CPI(M) MLA from Devikulam SC Seat
ए. राजा हे धर्मांतर करून ख्रिश्चन बनले आहेत. त्यांनी देवीकुलम या अनुसूचित जातीच्या राखीव मतदार संघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून काँग्रेसचे उमेदवार डी. कुमार यांना पराभूत केले होते. मात्र डी. कुमार यांनी ए. राजा हे ख्रिश्चन असल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. ए. राजा यांचा विवाह ख्रिश्चन पद्धतीने चर्चमध्ये झाला आहे. त्यासंबंधीचे पुरावे देखील कुमार यांनी न्यायालयात दिले. त्यानंतर न्यायालयाने वर उल्लेख केल्याचा निर्णय दिला. ख्रिश्चन बनल्यानंतर हिंदू अनुसूचित जाती साठी राखी असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नाही असा निर्वाळा केरळ हायकोर्टाने दिला आणि त्यामुळेच ए. राजा यांची आमदारकी हायकोर्टाने रद्द केली.
या निर्णयाचे देवीकुलम मतदारसंघात तर राजकीय पडसाद उमटले आहेतच, पण केरळच्या राजकारणात देखील काँग्रेस विरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या संघर्षाला आता ख्रिश्चन विरुद्ध हिंदू अशी धार्मिक धार चढली आहे.
Kerala HC Cancels Election of CPI(M) MLA from Devikulam SC Seat
महत्वाच्या बातम्या
- Umesh Pal Murder Case : ५ लाखांचा इनाम असलेला शूटर गुलाम मोहम्मदच्या घरावर बुलडोझर
- रामसेतू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होणार
- मुंबई – गोवा महामार्गाची प्रतीक्षा डिसेंबर 2023 अखेरपर्यंत संपणार; काम पूर्ण होणार!!
- लंडनमध्ये तिरंग्याचा अपमान झाल्याबद्दल दिल्लीत शिखांचा संताप; ब्रिटीश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने