• Download App
    लव जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादवर टीका करणाऱ्या बिशपविरुद्ध केरळचे डावे सरकार खटला भरणार नाही Kerala Govt isn't considering taking any case against the Bishop.

    लव जिहाद आणि नार्कोटिक्स जिहादवर टीका करणाऱ्या बिशपविरुद्ध केरळचे डावे सरकार खटला भरणार नाही

    वृत्तसंस्था

    तिरुवनंतपुरम : केरळमध्ये लव जिहाद आणि त्याचबरोबर नार्कोटिक्स जिहाद सुरू आहे, अशी टीका करणाऱ्या बिशप जोसेफ कलातरंग यांच्याविरोधात केरळमधील डावे सरकार खटला दाखल करणार नाही. ही माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. Kerala Govt isn’t considering taking any case against the Bishop.

    ते म्हणाले की केरळमध्ये काही समाज घटक धर्मांध आहेत. परंतु संपूर्ण समाज धर्मनिरपेक्ष आहे. केरळचे सरकार मतस्वातंत्र्य मानते. त्यामुळे जोसेफ कल्लातरंग यांच्याविरुद्ध सरकार खटला दाखल करणार नाही.

    लव जिहादचा मुद्दा एका कॅथलिक ख्रिश्चन धर्म गुरुने उपस्थित केल्याने केरळच्या डाव्या सरकारची त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची हिंमत होत नाही, अशी टीका भाजपने आधीच केली आहे. आज त्याच्यावर मुख्यमंत्री विजयान यांनी वक्तव्य करून एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.

    यावरून सोशल मीडियात लव जिहाद तसेच नारकोटिक्स जिहाद या मुद्द्यांवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्याच वेळी केरळच्या डाव्या पक्षांच्या सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर देखील नेटिझन्सनी प्रश्नचिन्ह लावली आहेत. लव जिहादचा मुद्दा हिंदू समाजातील नेत्यांनी उपस्थित केल्यावर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जातो. पण तोच मुद्दा ख्रिश्चन धर्मगुरु जेव्हा उपस्थित करतात तेव्हा डाव्या पक्षाच्या सरकारची त्यांच्या विरोधात खटला दाखल करण्याची हिम्मत होत नाही, अशी बोचरी टीका नेटिझन्सनी सोशल मीडिया केली आहे.

    Kerala Govt isn’t considering taking any case against the Bishop.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची