• Download App
    केरळ : कोचीमध्ये कोस्ट गार्डच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात Kerala Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi

    केरळ : कोचीमध्ये कोस्ट गार्डच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरला अपघात

    एक जण जखमी झाल्याची माहिती आहे, सर्व कर्मचारी सुरक्षित

    विशेष प्रतिनिधी

    केरळ :  भारतीय तटरक्षक दलाचे ALH ध्रुव मार्क3 हेलिकॉप्टर आज कोची विमानतळावरील मुख्य धावपट्टीजवळ कोसळले. अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती आहे, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टर रोटर्स आणि एअरफ्रेम खराब झाली आहे. आयसीजीने अपघाताच्या कारणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. Kerala Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi

    मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) वरून तटरक्षक दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर टेक ऑफ केल्यानंतर लगेचच क्रॅश झाले. हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी निघाले होते आणि हेलिपॅडवरून उड्डाण करत असतानाच ते कोसळले, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार एका व्यक्तीच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. ‘कोस्ट गार्ड एन्क्लेव्ह’ हे CIAL कॅम्पसमध्ये आहे.

    भारतीय तटरक्षक दलाचे (ICG ALH-DHRUV मार्क 3 हेलिकॉप्टर रविवारी केरळच्या कोचीमध्ये जबरदस्तीने उतरले. हेलिकॉप्टरमध्ये तीन पायलट होते आणि त्यापैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी जात होते. पायलट हेलिकॉप्टरची चाचणी घेत असताना जबरदस्तीने लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टर सुमारे २५ फूट उंचीवर होते तेव्हा त्याला जबरदस्तीने उतरवावे लागले. ICG ALH ध्रुव फ्लीट ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने काम करत आहे.

    Kerala Coast Guard ALH Dhruv chopper meets with accident in Kochi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के