वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळमधील एर्नाकुलम येथे 29 ऑक्टोबर रोजी ख्रिश्चन प्रार्थना सभेत झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 6 झाली आहे. घटनेच्या वेळी दोघांचा मृत्यू झाला होता. तर 50 जण जखमी झाले.Kerala blast death toll rises to 6; The bomb blast took place on October 29 during prayers
त्यानंतर 30 ऑक्टोबर, 6 नोव्हेंबर, 11 नोव्हेंबर आणि 16 नोव्हेंबरला आणखी चार जणांना उपचारादरम्यान जीव गमवावा लागला. पोलिसांनी स्फोटातील आरोपी डॉमिनिक मार्टिनला अटक केली असून UAPA गुन्हा दाखल केला आहे.
न्यायालयाने आरोपी मार्टिनला 29 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 54 गुन्हे दाखल केले आहेत. मलप्पुरम जिल्ह्यात सर्वाधिक 26 प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर एर्नाकुलममध्ये 15 आणि तिरुवनंतपुरममध्ये पाच प्रकरणे आहेत.
आरोपीने घरात बॉम्ब बनवला, सकाळी 7 वाजता ठेवला
बॉम्बस्फोटातील आरोपी मार्टिनने घटनेच्या दिवशीच पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले होते. मार्टिनने पोलिसांच्या चौकशीत अनेक खुलासे केले होते. त्याने सांगितले की, तो सोशल मीडियावरून बॉम्ब कसा बनवायचा हे शिकत होता. थमन्नन येथे तो भाड्याने राहत असलेल्या घराच्या छतावरही त्याने बॉम्बची चाचणी केली होती.
आरोपीने आपल्या कबुलीजबाबात सांगितले की, कोचीच्या बाहेरील अलुवा येथील त्याच्या वडिलोपार्जित घरात त्याने बॉम्ब बनवले होते. रविवारी सकाळी सात वाजता त्यांनी प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवला होता. त्यावेळी तेथे तीन जण उपस्थित होते.
मात्र, त्यांनी पोलिसांच्या टिफिन बॉक्सच्या सिद्धांताचे खंडन केले. मार्टिनच्या म्हणण्यानुसार त्याने स्फोटकांच्या सहा प्लास्टिकच्या पिशव्या तयार केल्या होत्या. पेट्रोलने भरलेल्या बाटल्या आणि कोची येथून खरेदी केलेले 50 फटाकेही बॅगेत ठेवले होते, जेणेकरून मोठा स्फोट होऊन आग होऊ शकेल.
Kerala blast death toll rises to 6; The bomb blast took place on October 29 during prayers
महत्वाच्या बातम्या
- Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- नैनितालमध्ये भीषण अपघात, दरीत जीप कोसळून आठ जणांचा मृत्यू
- बिहार, गुजरातमध्ये अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय घट; केरळमध्ये रोजंदारीचे प्रमाण सर्वाधिक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल
- जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश ; कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी ठार, ५ जणांना घेरले