• Download App
    केरळ : विमानतळावर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय, शिलाई उसवताच सोन्याची दोन नाणी सापडली । Kerala: Authorities suspect two gold coins found at the airport

    केरळ : विमानतळावर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय, शिलाई उसवताच सोन्याची दोन नाणी सापडली

    त्या लिफाफ्यामध्ये प्लास्टिकची दोन पाकिटं हाती लागली.त्या पाकीटांमध्ये दोन-दोन नाणी होती. Kerala: Authorities suspect two gold coins found at the airport


    विशेष प्रतिनिधी

    केरळ : केरळच्या कालिकत विमानतळावर एकाला अटक करण्यात आली आहे.चपलेतून सोन्याची तस्करी करणाऱ्याला विमानतळावर अटक करण्यात आली आहे.विमानतळावर तैनात असलेल्या अधिकाऱ्यांमुळे सोन्याच्या तस्करीचा हा डाव उधळला गेला आहे.

    घटना काय घडली?

    दुबईहून कालिकत विमानतळावर दाखल झालेल्या एका व्यक्तीची अधिकाऱ्यांनी चौकशी केली.चौकशीदरम्यान त्याच्याकडे असलेलं सामान तपासण्यात आलं.मात्र काहीही आढळून आलं नाही.दरम्यान एका अधिकाऱ्यांचं लक्ष त्या व्यक्तीच्या चपलांकडे गेलं.त्याच्या चपलांची शिलाई काहीशी वेगळीच दिसत होती. शिलाई नुकतीच करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं.



    दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाला चप्पल काढण्यास सांगितलं.यावेळी त्याच्या चप्पल ची शिलाई काढण्यात आली.दरम्यान त्यातून एक लिफाफा हाती लागला. त्या लिफाफ्यामध्ये प्लास्टिकची दोन पाकिटं हाती लागली.त्या पाकीटांमध्ये दोन-दोन नाणी होती.दोन्ही चपलांमध्ये अधिकाऱ्यांना सोन्याची नाणी सापडली.

    Kerala : Authorities suspect two gold coins found at the airport

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे