• Download App
    नरकचतुर्दशीच्या पहाटे योगी राम लल्लांच्या चरणी; देशभर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी!! । Kerala । Devotees visit Sree Padmanabhaswamy Temple in Thiruvananthapuram on the occasion of Diwali

    नरकचतुर्दशीच्या पहाटे योगी राम लल्लांच्या चरणी; देशभर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी!!

    वृत्तसंस्था

    अयोध्या : दिवाळीच्या पूर्वसंध्येला अयोध्येमध्ये दीपोत्सवाचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज पहाटे नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर राम जन्मभूमी वर जाऊन राम लल्लांचे दर्शन घेतले, तसेच त्यांनी हनुमान गड येथे जाऊन श्री हनुमंताचे दर्शन घेतले. Kerala । Devotees visit Sree Padmanabhaswamy Temple in Thiruvananthapuram on the occasion of Diwali

    राम लल्लांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. अयोध्येमध्ये दीपोत्सवाच्या निमित्ताने मोठी गर्दी झाली आहे. काल सायंकाळी दीपोत्सव झाल्यानंतर आज पहाटे भाविकांनी लाखो भाविकांनी राम लल्लांच्या दर्शनासाठी गर्दी केली.

    देशभरातील विविध मंदिरांमध्ये दिवाळीच्या पहिल्या दिवसानिमित्त दर्शनासाठी गर्दी आहे. तिरुवनंतपुरमच्या पद्मनाभ मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

    महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व संत तीर्थस्थळे येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसल्या. गेल्या वर्षी कोरोना काळामुळे दिवाळीत मंदिरे बंद होती. यंदा मात्र मंदिरे मर्यादित प्रमाणात उघडून राज्य सरकारने भाविकांच्या दर्शनासाठी नियमावली तयार करून दिली आहे. बहुसंख्य मंदिर व्यवस्थापनांनी या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु दर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे.

    दिल्ली, अहमदाबाद मधील अक्षरधाम मंदिरे भाविकांनी फुलून गेली आहेत. कोलकत्ताच्या कालीघाटावर देखील प्रचंड गर्दी आहे. इस्कॉनच्या मंदिरांमध्ये भाविकांनी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

    Kerala । Devotees visit Sree Padmanabhaswamy Temple in Thiruvananthapuram on the occasion of Diwali

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    SC Notice : मनमानी विमान भाडेवाढीबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर; केंद्र, DGCA आणि AERA यांना नोटीस

    Delhi Blast, : दिल्ली स्फोटप्रकरणी अतिरेकी उमरच्या आणखी एका साथीदाराला अटक; ड्रोन-रॉकेट बनवले, तांत्रिक मदत पुरवली

    CJI BR Gavai : सरन्यायाधीश बी.आर. गवई यांचे आरक्षणावर मोठे वक्तव्य, अनुसूचित जातींतही (SC)लागू व्हावे ‘क्रीमी लेयर’