वृत्तसंस्था
पणजी : गोवा पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी केजरीवाल यांना 27 एप्रिलला हजर राहण्यास सांगितले आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक मालमत्तेवर बेकायदेशीरपणे पोस्टर चिकटवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. kejriwal’s trouble increases, Goa police notice for pasting posters during elections
नोटीसमध्ये काय आहे?
पेरनेम पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप कुमार हलर्णकर यांनी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 41(ए) अंतर्गत नोटीस बजावली आहे. CrPCच्या कलम 41(a) अन्वये, पोलिस एखाद्या व्यक्तीची वाजवी तक्रार असल्यास किंवा त्याने गुन्हा केल्याचा संशय असल्यास त्याला चौकशीसाठी बोलावू शकतात.
तुमची चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे : पोलिस
केजरीवाल यांना बजावलेल्या नोटीसमध्ये गोवा पोलिसांनी म्हटले आहे की, या प्रकरणाच्या तपासादरम्यान सध्याच्या तपासासंदर्भात तथ्य आणि परिस्थिती जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे चौकशी करण्यासाठी वाजवी कारणे असल्याचे आढळून आले आहे. नोटीसनुसार केजरीवाल यांना 27 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पेरनेम पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
गोव्यात पक्षाचा दोन जागांवर विजय
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक ठिकाणी भिंतींवर निवडणुकीचे पोस्टर चिकटवल्याप्रकरणी गोवा प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्याची पेरनेम पोलीस चौकशी करत आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. विशेष म्हणजे 2022 च्या निवडणुकीत राज्यात आम आदमी पक्षाने दोन जागा जिंकल्या होत्या.
kejriwal’s trouble increases, Goa police notice for pasting posters during elections
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…